पूर्णा । प्रतिनिधी :- परभणीचे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या आदेशाने पूर्णेत नगरपरिषद येथे दि २५ जानेवारी रोजी खातेप्रमुख यांच्यात वसूली संदर्भात मुख्याधिकारी नितीशकुमार बोलोलू यांनी बैठक घेतली.
शहरातील नागरीकाकडून घरपट्टी, नळपाणी पट्टी वसूल करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी नगरपरिषद येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते. वसुलीचे कडक आदेश देण्यात आले. यावरुन सर्व वसूली पथक गतीमान करण्यात आले आहेत. पैसे नाही भरल्यास पाणी पुरवठा बंद करण्यास सांगितले. सध्या दिड कोटी थकबाकी असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले.

