पूर्णा । वार्ताहर : - नगरपरिषद पूर्णा येथे दि २६ जानेवारी रोजी सकाळी ८:१५ वाजता प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी सर्वोतोपरी झेंडावंदन जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती पूर्णा नगरपरिषदचे मुख्याधिकारी नितीशकुमार बोलेलू यांनी दिली असून झेंडा वंदनास उपस्थित राहणा-या आमंत्रित मान्यवरांनी तोंडाला मास्क बांधून सोशियल अंतर ठेवावे आणि तहसील कार्यालय येथे व सरकारी दवाखाना येथे देखील उपस्थितांनी कोरोनाचे नियम पाळावेत. तसेच मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत झेंडा वंदन साजरा केला जाणार आहे. तहसील येथे तहसीलदार पल्लवी टेमकर तर सरकारी दवाखाना येथे वैद्यकीय अधिक्षक एस एल गाडेकर यांच्या हस्ते तिरंगा झेंडा वंदन करण्यात येणार आहे.
मास्क न लावणा-याकडून दंड वसूल करण्यात आला आहे. आतापर्यंत ७५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी दिली आहे. दंड वसूल करणा-या पथकात बाबूखान पठाण, रघुनाथ कांबळे, साईनाथ दुधे, श्यामपाल सौदा, दिपक गवळी नईम खान, ( स्वच्छता निरीक्षक) सोनाजी खिलारे, इमरान खान पठाण, बाबरखान पठाण, माकूलवार, रापतवार, उत्तम बन्सी कांबळे ईत्यादी कर्मचारी कोरोनाचे नियम पालनासाठी सहकार्य करीत . कोरोना लसीकरणासाठी मिळत आहे.
-

