shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जांभूळबेटावर प्रजासत्ताक दिनी होणार झेंडावंदनसंवर्धन समिती चा पुढाकारउपस्थित राहण्याचे आवाहन..!

परभणी । प्रतिनिधी-
पालम तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रात मधोमध वसलेल्या निसर्ग रम्य पर्यंटन स्थळ असलेल्या जांभूळ बेटावर २६ जानेवारी रोजी सकाळी ७:३० वाजता प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करण्यात येणार आहे जांभूळ बेट संवर्धन समिती ने यासाठी पुढाकार घेतला असून निसर्ग प्रेमी नी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

जांभूळ बेट येथे मागील ती वर्षा पासून लोकसहभागातून परिसराचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत लोकवर्गणी व श्रमदान करीत परिसरात विकास कामे करण्यात येत आहेत जांभूळ बेट संवर्धन समिती ने लोकसहभागातून गोदावरी नदीच्या पात्रातून पाण्यातून जाण्यासाठी बोट खरेदी करून माफक दरात पर्यटकांची सोय केल्याने भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे 

२६ जानेवारी रोजी झेंडावंदन करून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत यावेळी निसर्ग प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन कांतराव काका झरीकर, गोविंद दुधाटे, संतोष मुगटकर, उपसरपंच राम कदम, पत्रकार लक्ष्मण दुधाटे, प्राचार्य डॉ आत्माराम आरसुळे, संदीप दुधाटे, मुकुंद महाराज गिरी, बालाजी चांदणे , प्रकाश गिरी गुरुजीं आणि संवर्धन समितीच्या सर्व सदस्यांनी
केले आहे.
close