shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

युवा क्रांती प्रतिष्ठाण संचलित इंदापूर स्क्रॕप बँक च्या माणुसकीच्या भिंती चे लोकार्पण सोहळा माजी सैनिक बांधवाच्या हस्ते संपन्न..गरीब गरजुंसाठी मदतीचा हात.

युवा क्रांती प्रतिष्ठाण संचलित इंदापूर स्क्रॕप बँक च्या   माणुसकीच्या भिंती चे लोकार्पण सोहळा माजी सैनिक बांधवाच्या हस्ते संपन्न..

गरीब गरजुंसाठी मदतीचा हात.
 
 इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील गेले ११ वर्ष इंदापूर करांच्या दातृत्वाची ओळख सर्वश्रूत करणारा हा ऊपक्रम.
ऊस तोडणी कामगार ,वीटभट्टी कामगार, परप्रांतीय मजूर फिरती विक्रेते अनाथ निराधार अशा हजारो लोकांना त्यांच्या पालावर वस्त्यांवर जावून अतिशय प्रेमाने आणि सन्मानाने आपण समाजातून विवीध क्षेत्रातून आलेली मदत युवा क्रांती प्रतिष्ठान पोहच करते.
चांगल्या अवस्थेतील अथवा नविन शैक्षणिक  साहित्य खेळणी , कपडे,  घरगुती वस्तु ,चपला, स्कूल बॕग  दानशुर व्यक्ती कडून घेवून गरजु पर्यंत त्यांच्या पालावर जावून अतिशय प्रेमाने आणि सन्मानाने  पोहच करीत आले आहेता.
माणुसकीची भिंत शुभारंभ
व  माजी सैनिक बाँधवाचा सन्मान समारंभ बुधवार दि. २६जानेवारी २०२२ सकाळी ९.०० वाजता  प्रजासत्ताक दिनाच औचित्य साधून सर्व माजी सैनिक बांधवाच्या शुभ हस्ते  माणुसकीची भिंत च लोकार्पण इंदापूर बस स्टँड समोर  संपन्न झाला. 
तसेच युवा क्रांती प्रतिष्ठाणच्या वतीने या भारतमातेच्या सुपुत्रांचा सन्मान  करण्यात आला. कारगिल योद्धे माजी सैनिक कैलाश गवळी, माजी सैनिक तथा कुस्तीपट्टू मारूती मारकड ,  माजी सैनिक रविराज पवार , व त्यांचे सहकारी  माजी सैनिक यांचा सन्मान करण्यात आला. 
पतंजली योग समितीचे सचिन आबा पवार व सहकारी मित्र यावेळी ऊपस्थित राहूनमाणुसकीच्या या ऊपक्रमाला शुभेच्छा दील्या.
 विशेष सहकार्य.माजिदभाई पठाण व रचना परिवार या द्वारे आवाहन करण्यात येते की, ज्या व्यक्तीँना आपली मदत  कपडे पुस्तके  शैक्षणिक , संसारोपयोगी साहित्य याची मदत करायची असेल त्यांनी युवा क्राँती प्रतिष्ठाण च्या सहकारी बांधवाशी संपर्क साधा.
 हा ऊपक्रम यशस्वी करण्या साठी ,अस्लम शेख , सचिन परबते. मृत्युंजय शिताप,न्यानू डोंगरे,ऊमेश राऊत.कल्पनाताई भोर,दशरथ भोंग,  बाळासाहेब क्षिरसागर.
धरमचंद लोढा याँनी परिश्रम घेतले.दिवसभरात ३०० हून अधिक गरजुंनी याचा लाभ घेतला. अशी माहिती युवा क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत शिताब यांनी दिली.
close