shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जागतिक विक्रम करणाऱ्या कु. प्रतीक्षा पाटील हिचा श्री वर्धमान विद्यालयात झाला सन्मान

जागतिक विक्रम करणाऱ्या कु. प्रतीक्षा पाटील हिचा श्री वर्धमान विद्यालयात झाला सन्मान
इंदापूर प्रतिनिधी:कु. प्रतीक्षा सुनील पाटील हिने २४ जानेवारी २०२२ रोजी अधोमुख श्वानासन या योगासन प्रकारात तब्बल ७५ मिनिटे आसन स्थितीत रहाण्याचा जागतिक विक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेतली जाणार आहे. ही जागतिक विक्रम करणारी कु. प्रतीक्षा पाटील ही श्री वर्धमान विद्यालयाची माजी विद्यार्थिनी असून तिने केलेल्या विश्व विक्रमासाठी तिचे विद्यालयाच्या मार्फत  सन्मान करण्यात आला.
विश्वविक्रम करण्यासाठी नशिबावर अवलंबून न राहता मेहनत,जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश प्राप्त करता येते असे उत्सवमूर्ती कुमारी प्रतीक्षा पाटील हिने प्रतिपादन केले.
प्रस्ताविक करत असताना उपप्राचार्य अरुण निकम आपल्या भाषणात म्हणाले की प्रतीक्षा पाटील ही सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन असामान्य कामगिरी करून दाखवली आहे. जागतिक विक्रम प्रस्थापित करून पालकांना अभिमान वाटेल असे महान कार्य तिच्या हातून घडले आहे. आई-वडिलांनी तिच्या प्रत्येक कार्यात सहकार्य करून आदर्श माता पिता असण्याचे कर्तव्य पूर्ण केले आहे.
या कार्यक्रमासाठी शाळा  समितीचे अध्यक्ष अमोल गेंगजे, प्रमुख पाहुणे कृष्णदेव क्षीरसागर, प्राचार्य हनुमंत कुंभार उपमुख्याध्यापक बाळासाहेब पडारी, पर्यवेक्षक काशिनाथ हिरवे व माणिक पिसे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुरज मोरे यांनी केले.
close