shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे नवनिर्वाचित रासपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नाना शेवते व महाराष्ट्र प्रदेश मुख्य महासचिव ज्ञानेश्वर (माऊली) सलगर यांचा निवडीबद्दल राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर तालुक्याच्या वतीने आयोजित सत्कार सोहळा संपन्न.

इंदापूर येथे नवनिर्वाचित रासपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  काशिनाथ नाना शेवते  व  महाराष्ट्र प्रदेश मुख्य महासचिव  ज्ञानेश्वर (माऊली) सलगर यांचा निवडीबद्दल राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर तालुक्याच्या वतीने आयोजित सत्कार सोहळा  संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक २९ जानेवारी २०२२ रोजी इंदापूर येथे नवनिर्वाचित राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  काशिनाथ नाना शेवते  व राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र प्रदेश मुख्य महासचिव  ज्ञानेश्वर (माऊली) सलगर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर तालुक्याच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित केला होता या सत्कार सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून अजित  पाटील पश्चिम महाराष्ट्र युवक प्रभारी, खंडेराव सरक सातारा जिल्हा प्रभारी, आप्पासाहेब सुतार पुणे जिल्हा प्रभारी, लक्ष्मण सरगर सांगली, उमाजी चव्हाण सांगली, रंणजीत  सूळ सोलापूर, संतोष ठोंबरे फलटण , किरण गोफणे पुणे जिल्हा प्रभारी, सतीश शिंगाडे, सतीश तरंगे इंदापूर तालुका प्रभारी, तानाजी  शिंगाडे, शहाजी भाळे, बजरंग वाघमोडे, गणेश हेगडकर, माणिक मारकड, विजय इंगोले, आप्पा माने, नवनाथ कोळेकर, सचिन पलंगे, सागर रास्ते, तानाजी मारकड, राजू जानकर, आजिनाथ शेंडगे, शक्ती पालवे, अतुल शिंगाडे, दयानंद हेगडकर, समाधान काशीद, समाधान घोडके, अजिंक्य शेटे, किरण पारेकर, ज्योतीराम गावडे, सुरज कोकरे असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रात उभारी घेत असून भविष्यात लोकसभा व विधानसभेत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रतिनिधी दिसून येतील असे मत नूतन प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी व्यक्त केले ते आज इंदापूर येथे पदाधिकारी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की इंदापूर तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्ष उभारी घेत असून तालुक्यातील युवक मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय समाज पक्ष कडे आकर्षित होत आहेत.इंदापुरात भविष्यात होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार आहे.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष शेवते म्हणाले की २०१९ चा विधानसभा निवडणुकीवेळी मित्र पक्षाकडून रासपा ची फसवणूक झाली. परंतु खचून न जाता संपूर्ण राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.

 यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे नूतन मुख महासचिव ज्ञानेश्वर सलगर म्हणाले की, राष्ट्रीय समाज पक्ष हा नेहमी सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष आहे.रासप मुळे आज कित्येक सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना सत्तेत वाटा मिळाला.
आभार सतीश तरंगे यांनी मानले.
close