shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ज्यांच्याकडे काही नाही,त्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही...डाॅ पवन बनसोड..!


प्रतिनीधी । औरंगाबाद :-
आज प्रजासत्ताक दिनानिमित्त जन जागृती व पोलीस आणि पारधी यांच्यातील कलंकित दरी कमी करून व त्यांच्या मनातील भिती मुक्त करुन त्यांना शासनाच्या सवलती कशा प्रकारे मिळतील या विषयी शेवराई शेवाभावी संस्था, पुणे व औरंगाबाद ग्रामीण पोलीसाच्या माध्यमातून भरवण्यात आलेला हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे. असे मत औरंगाबाद जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ, पवन बनसोड बोलत होते.

 ते पुढे म्हणाले की कष्टकरी व सुरक्षित पिढीत कुटुंबातील लोकांच्या पाठीशी आम्ही सदैव आहोत, तर 
( *ज्या लाल दिवानी रात्रंदिवस पळवलं त्याच लाल दिवाने आज घरी येऊन सन्मानित केलं हे आमच्यासाठी पारधी समाजातील बाधवांसाठी भाग्याचे आहे, समाजातील बांधवांनी घटनेच्या मार्गाने शांततेत शाहु ,फुले,आंबेडकर, यांच्या विचारांची कास धरुन चालावे तरच पुढच्या पिढीसाठी अदर्श  वाटचाल होईल असे मत आदिवासी समाजसेवक व साहित्यिक, नामदेव ज्ञानदेव भोसले यांनी व्यक्त केले)


  कुठेही चोरी झाली की पोलीस पहिले पारधी पाड्यावर तपासाठी जात होते .परंतू आमंचे आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले प्रयत्नामुळे प्रत्येक पिडीत कुटुंबाला न्याय मिळत आहे.

 नामदेव हे आमच्या समाजातील संत आहेत असे पंडित कुटुंबातील आय जी चव्हाण यांनी आपल्या भावना व्येक्त केल्या .


  आदिवासी पारधी पाड्यावर प्रजासत्ताक दिन उपस्थित मान्यवरांच्या आनंदाने साजरा करण्यात आला.

 या कार्यक्रमांमध्ये प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व पटवून देण्यात आले व शासनाच्या सुख सुविधा कशा स्वरुपात आपल्याला मिळतील याविषयी जनजागृती करण्यात आली, 

गेली एकवीस वर्षे शेवराई सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून  असे विविध कार्यक्रम आदिवासी पाड्यावर राबवले जातात.
 याच अनुषंगाने आज औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यांमध्ये वडजी या गावी आ जी चव्हाण यांच्या  पाड्यावर  प्रजासत्ताक दिन पारधी पाड्यावर साजरा करण्यात आला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक व आय पी एस, श्री. डॉ. पवन बनसोडे  व मार्गदरषक म्हणून आदिवासी समाजसेवक साहित्यिक,नामदेव भोसले, औरंगाबाद विभागचे शांतीदूत व  जिल्हा अध्यक्ष, राजु पवार, डी. वाय. एस. पी. श्री भववर साहेब, पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे सुरेश,याच्या हस्ते वृक्षारोपण व मुलांना मिठाई वाटप करण्यात आले.

बीट आमदार मोहिते हवलदार तळपे गावचे सरपंच, पोलीस पाटील, व शेवराई सेवाभावी संस्थेचे सर्व सदस्य सामाजिक कार्यकर्ते समस्त गावकरी आणि आदिवासी पारधी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच भाऊसाहेब गोजरे यांनी केले,तर अभार पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी केले.
close