shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ओटीपी विचारुन १ लाख ३८ हजार रुपये लंपास,पोलीसात गुन्हा दाखल..!

पूर्णा (प्रतिनिधी) दि.27:- शहरातील शास्त्रीनगर परिसरामध्ये राहणा-या एका वृद्ध व्यक्तीस ओटीपी विचारुन घेऊन १ लाख ३८ हजार रुपये लंपास केले आहे. पूर्णा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी की पूर्णा शहरातील शास्त्रीनगर परिसरामध्ये राहणारे सय्यद शफी पिता सय्यद तमीज
हे शहरांमध्ये खाजगी नोकरी करतात.  23 जानेवारी रोजी दुपारी त्यांच्या मोबाईलवर 8445235286 या मोबाईल धारकाने त्याला मोबाईल नंबर वर मोबाईल घेऊन क्रेडिट कार्ड खात्यातील ओटीपी विचारला.

ओटीपी विचारून त्याच्या स्टेट बँक ऑफ पूर्णा शाखेतील खात्यामधून जवळपास एक लाख 38 हजार रु.ची रक्कम परस्पर काढून घेतली, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले असते फिर्यादी सय्यद शफी यांनी या घटनेची माहिती पूर्ण पोलिसांना दिली, दरम्यान घटनास्थळाला पोलीस निरीक्षक सुभाष मार्कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुळे यांनी भेट देऊन पाहणी केली व त्या  अज्ञात मोबाईलधारक आरोपीविरुद्ध पूर्णा पोलीस स्थानकात कलम 420 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पूर्ण पोलीस करीत आहेत.
close