shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खडांबे खुर्द येथील माजी उपसरपंच यांचा अनोखा उपक्रम : वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळेला प्रिंटर व गणवेश वाटप..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक १२ डिसेंबर २०२२

खडांबे खुर्द येथील माजी उपसरपंच यांचा अनोखा उपक्रम : वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळेला प्रिंटर व गणवेश वाटप..!!

 राहुरी : वाढदिवसानिमित्त खडांबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला १८ हजार रुपये किमतीचे ऑल इन वन प्रिंटर ची भेट तसेच शाळेतील मुलांना गणवेश वाटप करून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व खडांबे खुर्द चे माजी उपसरपंच प्रभाकर  हरिश्चंद्रे यांनी समाजापुढे एक वेगळाच आदर्श ठेवला आहे.

        सावित्रीबाई फुले जयंतीला खडांबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा अभिनव उपक्रम राबवण्यात आलेला होता या वाढदिवसाच्या प्रसंगी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत असताना इतर मंडळी हॉटेलमध्ये,तसेच आपल्या मित्र परिवाराबरोबर  इतर अनेक  पद्धतीने आपला जन्मदिवस साजरा करतात.

      परंतु खडांबे येथील शाळाव्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी या सर्व  गोष्टींना फाटा देऊन  आपल्या शाळेला ऑल-इन-वन पेन्टरची विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सर्वांना उपयोगी पडेल अशी वस्तू भेट देऊ केली तसेच यावेळी विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला यावेळी वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती शाळेतील सर्व मुलांनी अप्रतिम अशी वेशभूषा सादरीकरण केली
       या कार्यक्रमास विठ्ठल हरिश्चंद्रे, योगेश मोकाटे, मयूर शेळके, संदीप खेडेकर, उज्वला कल्हापूरे  आरती काळे, मनीषा रसाळ, उर्मिला दुबे, मारुती कुलट, रावसाहेब जाधव, मनीषा विप्रदास, मंदा कुलट आदी. शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close