शिरसगाव (बाबासाहेब चेडे ) :- बुस्टर डोस घेण्यात जेष्ठ हे आघाडीवर राहिले पाहिजे, ही आरोग्यासाठी आणि मानसिक स्वाथ्यासाठी जबाबदारीचीअतिशय प्रेरणादायी जाणीव असल्याचे मत वाणिज्य कॉलेजचे माजी प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर आझाद मैदानावरील आगाशे सभागृहात कोरोना लसीकरण आणि बुस्टर डोस नागरिकांच्या उत्साही गर्दीत सुरू आहे, या उपक्रमात माजी प्राचार्य टी. ई. शेळके, प्राचार्य डॉ.शन्करराव गागरे,साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रा.शिवाजीराव बारगळ या सेवानिवृत्त जेष्ठांनी बुस्टर घेतल्यानंतरच्या चर्चेत प्रा.बारगळ बोलत होते.डॉ.मुकुंद शिंदे यांनी आलेल्या सर्व जेष्ठ नागरिकांचे अभिनंदन करीत जेष्ठांचा यासाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. प्रसन्न धुमाळ यांनी जेष्ठांचे स्वागत करून मनापासून सर्वांना सहकार्य केले.यावेळी भारताचे प्रांजळ आणि प्रभावी लोकश्रद्धेचे माजी पंतप्रधान स्व. लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला सर्वांनी अभिवादन केले.
जय जवान जय किसान असे उदगार काढून सैनिक आणि शेतकरी यांचा कैवार घेणारे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री भारतीयांच्या मनामनात घर करून आहेत, त्यांना अभिवादन करण्यात सार्थ गौरव वाटतो असे मत माजी प्राचार्य शेळके व्यक्त केले. प्राचार्य डॉ. गागरे यांनी आगाशे सभागृहातील कोरोना लसीकरण केंद्रात अतिशय शिस्तबद्व आणि आपुलकीचे वातावरण असल्याबद्दल आनंद व्यक्त करीत सर्व डॉक्टर, कर्मचारी यांचे कौतुक केले. आगाशे सभागृहातील शिस्त, सहकार्य वृत्ती,कामाचा उरक आणि सौहार्द वातावरण याबद्दल डॉ. बाबुराव उपाध्ये यांनीही डॉ. मुकुंद शिंदे,डॉ. तौफिक शेख, प्रसन्न धुमाळ,श्रीकांत थोरात राकेश गायकवाड, लक्ष्मीकांत करपे,सिस्टर खरात, सिस्टर आल्हाट, सिस्टर हाडोळे आणि सर्व आरोग्यसेवक यांच्याबद्दल धन्यवाद व्यक्त करून हे सर्व अतिशय सहकार्यशील आणि सेवाभावाने कार्यरत आहेत हा आनंद व्यक्त करीत आभार मानले.

