shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खासगी जागेत 'शाळा'; दोन अधिकारी निलंबित.....!बोधेगाव जिल्हा परिषद शाळेच्या दोन खोल्यांचे विनापरवानगी बांधकाम प्रकरण भोवले.....!



बोधेगाव जि. प. शाळा वर्ग खोल्या प्रकरणी तात्कालिन गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुखाचे निलंबन.....!

उर्वरित दोषीवर कारवाई न झाल्यास जिल्हा परिषदेसमोर करणार जागरण गोंधळ.....!

शेवगांव तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ.......!
.................................................................
दिनांक १२
एरंडगाव । प्रतिनिधी :- 
जिल्हा परिषद शाळेच्या दोन खोल्यांचे बांधकाम विनापरवानगी जिल्हा परिषदेची जागा सोडून खासगी मालकीच्या जागेत केल्या प्रकरणी दोन बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये शेवगावचे तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी आणि मूळ विस्तार अधिकारी पदावर कार्यरत असणारे रामनाथ कराड आणि शेवगाव तालुक्यात कार्यरत असणारे केंद्र प्रमुख रामराव ढाकणे अशी त्यांची नावे आहेत. जिल्हा परिषद सेवा वर्तणूकेत भंग केल्याने या दोघावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी १९६४ चा भाग २ मधील ३ अन्वये सक्तीचा वापर करून निलंबनाची कारवाई केली आहे.

        गटविकास अधिकारी रामनाथ कराड आणि केंद्र प्रमुख रामराम ढाकणे यांनी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन दोन शाळा खोल्यांचे मंजूर झाल्यानंतर ते विनापरवानगी जिल्हा परिषदेची जागा सोडून इतरत्र खागसी मालकीच्या जागेत बेकायदेशीर बांधकाम केले. त्या बाबत बोधेगावचे माजी सरपंच रामजी अंधारे यांनी त्याबाबत तक्रार केली होती. या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांचा झालेला खर्च निधी वाया गेेला. निलंबन झाल्यानंतर कालावधीत या दोघांचे मुख्यालय हे नेवासा तालुका करण्यात आले आहे. याबाबत या घटनेने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.



जि. प. शाळा वर्ग खोल्याच्या अनधिकृत जागेतील बांधकामासंदर्भात दोषीवर कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता, यामध्ये शिक्षण विभागाने कारवाई केली आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामसेवक, ईंजिनिअर व पदाधिकारी यांच्यावर अद्याप कारवाई केलेली नाही. काही दिवसात कारवाई न झाल्यास येत्या २६ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेसमोर जागरण गोंधळ करण्यात येईल.
रामजी अंधारे
माजी सरपंच,बोधेगाव



अनधिकृत जागेतील शाळा वर्ग खोल्यासंदर्भात ग्रामसेवक, ईंजिनिअर यांच्या संदर्भातील अहवाल येत्या काही दिवसात जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात येईल.
  महेश डोके
 गटविकास अधिकारी
 पंचायत समिती,शेवगांव

.....................................…......................

शाळा खोल्याचे बांधकाम प्रकरणातील दोषी असणाऱ्या संबधित ग्रामविकास अधिकारी व बांधकाम विभागाच्या सिव्हिल इंजिनियर यांच्यावर कारवाई करण्यास जिल्हा परिषद कडून दिरंगाई केली जात असल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे.



चोर सोडून संन्यासीला फाशी....!

शाळा खोली बांधकाम ही बाब शाखा अभियंता, ग्रामसेवक यांचेशी निगडित आहे. शिक्षण यंत्रणेला दोषी धरणे हा प्रकार चुकीचा आहे. शाखा अभियंता, उप अभियंता, ग्रामसेवक सोडून शिक्षण यंत्रणेला जबाबदार धरणे चूक आहे, नेमका हा काय प्रकार असावा, झालेली कारवाई ही चुकीची कारवाई होत असून दोषींवर कारवाई करण्याऐवजी चोर सोडून संन्यासीला फाशी देण्यासारखे आहे अशी चर्चा तालुक्यातील शिक्षक, शिक्षक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून दबक्या आवाजात सर्वत्र ऐकावयास मिळत आहे.

 अनधिकृत जागेतील शाळा वर्ग खोल्याचे बांधाकाम.....!

रामजी अंधारे , माजी सरपंच, बोधेगाव 

फोटो प्रवीण खोमणे
close