शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
अहमदनगर । प्रतिनिधी :-
रविवार दिनांक ९/१/२२ रोजी संत रविदास महाराज तिसरे धाम क्रात्रज येथे संत रविदास महाराज यांना विनम्र अभिवादन करुन अखिल भारतीय रविदासीया धर्म संघटन चे चेअरमन आदरणीय निरजंनदासजी महाराज यांच्या आशिर्वादाने तसेच राष्ट्रीय अध्यक्ष मा.सुखदेवजी महाराज यांच्या शुभहस्ते मा.संजयजी खामकर (अहमदनगर ) यांची महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष पदी एकमताने निवङ करण्यात आली.
तसेच राज्याचे पदधिकारी म्हणुन मा.सुर्यकांतजी गवळी (पुणे) - महासचिव, मा.चंद्रप्रकाश देगलुरकर (नांदेड ) - कार्याध्यक्ष,मा.गोविंदराव खटावकर (सांगली )- सह-सचिव,मा.दिनेश देवरे (खान्देश )- राज्य- संघटन पदी निवङ करण्यात आली असुन राष्ट्रीय कार्यकाराणी सदस्य तसेच महाराष्ट्रातुन अनेक सामाजिक संघटनेचे पदधिकारी सामाजिक नेते,कार्यकर्ते उपस्थितीत होते. सर्व नवनियुक्त पदधिकारी यांचे अभिनंदन करुन पुढील संत रविदास महाराज यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करुन अखिल भारतीय रविदासीया धर्म संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील चर्मकार समाज एकसंघ करण्यासाठी शुभेच्छा दिल्यात रविश्री अमोल वाघमारे यांनी सुत्रसुचंलन केले. तर आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार श्री अमोल डोळस यांनी मानले...

