shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रक्तदान करून कोविड १९ च्या काळात विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली- नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील



एरंडगाव :
जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे, मारुतरावजी घुले पाटील महाविद्यालय,अहमदनगर येथे राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने युवा सप्ताह व संस्था विश्वस्त सभापती मा.डॉ.क्षितिज घुले पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अष्टविनायक ब्लड बँक अहमदनगर तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कोविडचे सर्व नियम पाळून रक्तदान केले.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटक नगरसेवक मा.श्री.कुमारसिंह बबनराव वाकळे पाटील प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस,नगरसेवक अहमदनगर म.न.पा. हे होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.के.पंदरकर होते. यावेळी वाकळे पाटील म्हणाले की, सध्याच्या काळात कोविड १९ व ओमायक्रॉनमुळे रक्ताची गरज वाढली आहे. आपण केलेल्या रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचतात. कुठेतरी, कोणालातरी तुमच्या रक्ताची गरज आहे. जास्तीत जास्त रक्तदान करा असे आवाहन उपस्थितांना त्यांनी केले. यापुढील काळात महाविद्यालयाने घेतलेल्या सामाजिक उपक्रमांना सर्वतोपरी मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. तसेच अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.के. पंदरकर म्हणाले की, कोविड-१९ मुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. या रोगाच्या निवारणासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.त्याचा एक भाग म्हणून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळाने रक्तदान शिबिर घेऊन एक चांगले काम केले आहे. रक्तदान हे अनेकांसाठी जीवनदान देणारे आहे. युवकांनी केलेले हे रक्तदान एक श्रेष्ठ दान आहे. या पुढील काळात महाविद्यालयात अशा प्रकारचे अनेक सामाजिक उपक्रम बोल्हेगाव परिसरातील लोकांच्या सहकार्याने घेणार आहोत. या कार्यात सर्वांचे सहकार्य मिळाल्यास अनेक सामाजिक बदल घडण्यास मदत होईल.या कार्यक्रमास श्री रामभाऊ काते, श्री.पाटोळे साहेब,डॉ.संजय पठाडे,संजय मुळे,प्रा.एस.व्ही.मरकड,प्रा.पी.ए.फटांगरे, प्रा.एन.एन.झिंज,प्रा.एच.एस. सय्यद प्राध्यापिका आर.व्ही. राऊत,ऋतिक ताकपेरे,माजी विद्यार्थी गणेश कुऱ्हे,आकाश भगत,आनंद शर्मा, मयूर विजय कल्हापुरे याचे विशेष सहकार्य मिळाले. शिबिरास माजी विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला यामध्ये संग्राम सिंग भैस, श्रीमती नेहा भैस, रामदास रावतळे,सलीम तांबोळी या स्थानिक नागरिकांनी ही सामाजिक जाणिवेतून शिबिरात रक्तदान केले.मारुतरावजी घुले पाटील महाविद्यालय विशेष सहकार्यातून महाविद्यालयातील युवा तरुण विद्यार्थी,बोल्हेगाव परिसरातील पालक,माजी विद्यार्थी,५० पेक्षा जास्त उच्चांक ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केल्याबद्दल अष्टविनायक बल्ड बँक अहमदनगर तर्फे ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन प्राचार्य डॉ.ए.के.पंदरकर यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.के.आर.पिसाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा.एम.एल.कराळे यांनी केले. 

फोटो प्रवीण खोमणे
close