देहरे । प्रतिनिधी :
12 जानेवारी 2022 रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालय समोर जिजामाता यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून प्रतिमेस विनम्र अभिवादन करुन राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जय भवानी जय शिवाजी अशा घोषणाही देण्यात आल्या.
यावेळी माजी सरपंच विश्वासराव जाधव, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमोल डोळस, महेंद्र कोळकर, शिवसेना शाखा अध्यक्ष प्रवीण जाधव, युवा सेना शाखा अध्यक्ष किरण शेळके, इंद्रभान पुंड, सपकाळ मामा, अजित जाधव, भाऊसाहेब साळवे, शिवभक्त, ग्रामस्थ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते...

