shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिस्त आणि राष्ट्रीय कर्तव्यास प्राधान्य- हर्षवर्धन पाटील*

*शिस्त आणि राष्ट्रीय कर्तव्यास प्राधान्य- हर्षवर्धन पाटील*
  इंदापूर प्रतिनिधी :इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये 73 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की राष्ट्रीय छात्र सेनेचे शिस्त आणि राष्ट्रीय कर्तव्य हे ब्रीदवाक्य असून या तत्त्वाचा आपण अंगीकार केला पाहिजे.
  राष्ट्रीय छात्र सेनेतील विद्यार्थ्यांनी यावेळी उत्कृष्ट संचलन केले. हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेतील तसेच क्रीडा क्षेत्रातील आणि संशोधन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शरीरसौष्ठव स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी यावेळी उत्कृष्ट शरीरसौष्ठवातील विविध गुणांचे प्रदर्शन केले. 
    हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी जीवाचे रान केले, बलिदान दिले त्या स्वातंत्र्यसेनांच्या प्रतिमेला मी अभिवादन करतो. देशाचे कणखर आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशाची सर्व बाजूने विकासाची घोडदौड सुरू आहे. गेले दीड वर्ष आपण कोरोनाच्या संकटास सामोरे जात आहोत. परिपूर्ण नागरिक घडविण्याचे कार्य या संस्थेच्या महाविद्यालयाच्या माध्यमातून होत असून विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी आपले कार्यकर्तृत्व सिद्ध करीत आहेत. विद्यार्थ्यांना संस्थेच्या माध्यमातून सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
  महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय चाकणे यांनी प्रास्ताविक करून उल्लेखनीय कार्य केलेल्या विद्यार्थी, शिक्षकांच्या कार्याची माहिती दिली.
 यावेळी संस्थेचे सहसचिव प्रा. बाळासाहेब खटके, संचालक विलासराव वाघमोडे, माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, स्वामी समर्थ उद्योग समूहाचे बाळासाहेब पाटील, नगरसेवक कैलास कदम, माजी नगरसेवक शेखर पाटील, रघुनाथ राऊत क्रीडासंचालक डॉ.भरत भुजबळ उपस्थित होते.
  सूत्रसंचालन लेफ्टनंट प्रा. डॉ. बाळासाहेब काळे यांनी केले. आभार प्रा.बापू घोगरे यांनी मानले.
close