प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :- ====≈≈===========================
केज नगरपंचायतीच्या निवडणूका पार पडून कोणत्याही अघाडीला व पक्षाला बहूमत भेटले नव्हते .अश्यामध्ये मोठा घोडेबाजार होणार अशी सर्वसामान्य जनतेत चर्चा रंगत होती*.*अशा मध्ये रमेश आडसकर यांच्या नावाची जादुची कांडी फिरली व केज शहराचा विकास या गोंडस नावाखाली जनविकास परिवर्तन आघाडी व राष्ट्रीय काॅंग्रेस केज यांनीं तब्बल पाच वर्षांसाठी केज नगरपंचायतीच्या निवडणूका मध्ये युती करण्याची घोषणा आज खडकावर पत्रकार परिषद घेऊन केली.
या पत्रकार परिषदेत आदित्य पाटील,अंकुश इंगळे, हारूनभाई इनामदार, पशुपतिनाथ दांगट पाटील,मौला सौदागर,दिलीप गुळभिले व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आम्ही केज शहराच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत व आमची आघाडी पाच वर्षांसाठी मजबुती पणे टिकेल असा सुर सर्वच नेत्यांनी आवळला पण त्यांचे चेहरे सगळे काही सांगुन जात होते.
आपले गाव आपला विकास आपले सरकार या त्रिसुत्री वरती सलग पाच वर्षांसाठी केज शहरातील नागरिकांच्या सेवेत जनविकास परिवर्तन आघाडी, राष्ट्रीय काॅंग्रेस व इतर एकदा नगरसेवक हे केजकरांच्या सेवेत तत्पर असतिल अशे आश्वासन देऊन व केज शहरातील नेते आधी व बाहेरील नेते नंतर या मुद्दय़ावर एकमत होऊन हि आघाडी अस्तीत्वात आली आहे.
सदरील आघाडी सत्तेवर आरूढ होण्याकरिता रमेश आडसकर यांनी जादुची कांडी फिरवल्याने हे सगळे सत्तेचे गणित जुळले आहे अशी चर्चा सर्व केजकरांच्या ओठावर मोठ्या प्रमाणावर चालु झाली आहे.

