shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चाकाटी ग्रामपंचायत येथे ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध विकास कामाचे उद्घाटन संपन्न.

चाकाटी ग्रामपंचायत येथे ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
 प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध विकास कामाचे उद्घाटन संपन्न.
 इंदापूर प्रतिनिधी: आज चाकाटी ग्रामपंचायत येथे ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. ग्रामपंचायतचे ध्वजारोहण सरपंच संजय बबन रुपनवर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष केशव मारकड हे होते.
 तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण शालेय समितीचे अध्यक्ष विजय मारकड यांच्या हस्ते करण्यात आले. 
 तसेच गावातील अंतर्गत रस्त्याचे कामाचे भूमिपूजन या वेळी करण्यात आले.  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून चा काटी गावातील तनपुरे वस्ती येथे रस्त्याच्या कामासाठी १० लाख रुपये, फडतरे वस्ती येथे रस्ता कामासाठी ५ लाख रुपये तसेच गावातील अंतर्गत रस्त्यासाठी १० लाख रुपये आणि गटर कामासाठी ५ लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
 तसेच गावातील पिण्याच्या पाण्याचा फिल्टर( आर. ओ )चे उद्घाटन करण्यात आले.यावेळी सरपंच रुपनवर म्हणाले की, जे ग्रामपंचायत ची घरपट्टी व पाणीपट्टी रोख भरतील त्यांना वर्षभर पिण्याच्या पाणी व दळण मोफत अशी घोषणा त्यांनी केली.
,
३० लाख रुपयाच्या कामाचे भूमिपूजन करून उद्घाटन करण्यात आले असून इथून पुढे ही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून चाकाटी गावाला भरघोस निधी मिळेल असे इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर यांनी सांगितले.
 सदर कार्यक्रमास नवनाथ रुपनवर, संजय रुपनवर, केशव (काका) मारकड, विजय मारकड, सोपान  मारकड,  रामचंद्र पाटील, मोहन मारकड, रामचंद्र ननवरे, माऊली ननवरे, भारत पाटील,  अतुल तनपुरे, विलास भोसले, सागर तनपुरे, आबासाहेब मारकड, गणपत मारकड, केशव वाघमोडे, रामभाऊ रुपनवर, संजय रुपनवर, लखन घोडके, सतीश तरंगे, नवनाथ पाटील, बापू पाटील,अरुण पाटील, सुरेश मारकड, योगेश मारकड,  शरद मारकड, तानाजी बापू मारकड, शंकर  मारकड, रवींद्र झांबरे, नवनाथ घोडके, बाळू माने, मारुती वाघमोडे, ग्रामसेवक गायकवाड व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

 .
close