प्रतिनिधी : बाबासाहेब तिपुळे
नगर : २६ / ७३ व्या प्रजासत्ताक दिना निमित्त झेंडावंदन झाल्यानंतर कृषी अधीक्षक यांच्या मुख्यालयात दर वर्षी कृषी विभागा मार्फत कृषी क्षेत्रातील कृषी पर्यवेक्षक व साह्यक यांचा सत्कार सन्मान केला जातो. या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर कामाच्या मुल्यांकन मापनावर तालुक्यातील कृषी पर्यवेक्षक व कृषी साह्यक यांनी आप आपल्या कार्यक्षेत्रातील फळबाग लागवड प्रधानमंत्री सिंचन योजने अंतर्गत सर्वाधिक कामे केलेल्या कृषी पर्यवेक्षक व साह्यक यांना निमंत्रित करून कृषी अधिक्षकांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार सन्मान केला.
यामध्ये मनरेगा मधुन फळबाग लागवड उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नगर तालुक्यातील वाळकी दहिगावचे कृषी साह्यक वसंत भोईटे, संगमनेर अंतर्गत अकोले येथील व्हि एस बोडेॅ, तर श्रीरामपूर शेवगाव येथील गजानन अशोक चव्हाण, कर्जत जामखेड येथील रामदास बलभिम टेकाळे, तसेच प्रधानमंत्री सिंचन योजना प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल कृषी पर्यवेक्षक मधुन मच्छिंद्र जेजुरकर, वैशाली अडसुरे, राहुल क्षिरसागर, सुरेश खंडाळगे वरील कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कृषी अधीक्षक शिवाजीराव जगताप यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी कृषी विभागाचे अधिक्षक शिवाजीराव जगताप , कृषी उपसंचालक रविंद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, उपविभागीय कृषी अधिकारी राजाराम गायकवाड, नगर तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, वाळकीचे कृषी मंडळ अधिकारी अंकुश टकले.कृषी पर्यवेक्षक जिलिंदर गांगडेॅ, आदी
मान्यवर यावेळी उपस्थित होते.

