shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर महानगरपालिकेतील कर्मचारी सातवा वेतन आयोगापासून वंचित..!!


अहमदनगर । प्रतिनिधी :
 अहमदनगर महानगरपालिकेचा ठराव पाच वर्ष होऊन आज सहा वर्ष झाले तरी 7 वे वेतन आयोगाचे वेतन दिले जात नाही. अहमदनगर महानगरपालिका मनपा कर्मचारी यांचे मध्ये सध्या जोरदार चर्चा चालू असून कधी 7 वे  वेतन आयोग लागू होईल याबाबत कर्मचारी असे आस लावून बसलेला आहे.

 माननीय मंत्री आमदार श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे फाईल सहीसाठी असून मान.मुख्यमंत्र्यानी अजून देखील याबाबत दखल घेतली नसल्याचे एकंदरीत दिसते आहे.. याबाबत सध्या कर्मचाऱ्यांमध्ये उलट सुलट चर्चा चालू आहे.

औरंगाबाद, सोलापूर, पुणे, मुंबई या महानगरपालिकां मध्ये सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे. आजची अहमदनगर महानगर पालिकेची आर्थिक स्थिती जरी कमी असली तरी शासनाने सकारात्मक विचार करून अनुदान थोडे वाढवून देण्यास काही हरकत नाही.

आज 26 जानेवारी आहे, काहीतरी गोड बातमी जरूर मिळेल अशी कर्मचाऱ्यांना आशा वाटत होती. प्रत्यक्ष बघितले तर येथे फक्त सर्व राजकारण चालू असल्याचे सध्या दिसत आहे. त्यामुळे 7 वे वेतन आयोगाचा विषय सध्या तरी अधांतरी असल्याचे दिसत आहे.
close