शिर्डी । प्रतिनिधी ( संजय महाजन ) :
शिर्डी शहरातील पिंपळवाडी रोडवरील संजीवनी कॉम्प्लेक्स या मध्यवर्ती ठिकाणी बेबी केअर या नूतन फर्मचा उद्घाटन सोहळा जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते अतिशय उत्साहात पार पडला. यावेळी शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.
दुकानात प्रवेश करताच लहान मुलांची विविध खेळणी आणि कपडे पाहताच आपल्या नातवांसाठी खरेदी करण्याचा मोह शालिनीताई यांना देखील आवरला नाही त्यांनी अगदी सामान्य गृहिणी सारखी उत्सुकतेने प्रत्येक वस्तूची माहिती घेत आपल्या नातू साठी एक वस्तू खरेदी करत त्याचे पैसे देखील रोख स्वरूपात देत दुकानाची बोहणी केली. यावेळी चक्क शालिनीताई यांना पहिली वस्तू विकल्याचा आनंद वैभव कोते यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आला तसे पाहता शालिनीताई आणि कोते कुटुंबाचे कौटुंबिक नातेसंबंध सुद्धा असल्याने तो कौटुंबिक जिव्हाळा देखील यावेळी पाहावयास मिळाला.
शिर्डीतील कोते कुटुंबीयांच्या वतीने ह्या नूतन फर्मचे लहान मुलांसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंचे सुसज्ज दालन शिर्डीतील नागरिकांसाठी खुले झाल्याने आता लहान मुलांच्या अगदी छोट्या वस्तूंपासून मोठ्या खेळण्यांपर्यंत सर्व वस्तू शिर्डी शहरात उपलब्ध होत असल्याने शिर्डीकरांना यासाठी राहता कोपरगाव येथे जाण्याची गरज राहिली नसल्याचे वैभव कोते यांनी सांगत शिर्डीकरांच्या सेवेत अतिशय वाजवी दरात लहान मुलांच्या वस्तू मिळण्याचे ठिकाण म्हणून प्रसिद्धीस येईल असा विश्वास वैभव कोते यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी माजी सरपंच सुभाषराव कोते, प्रतापराव जगताप, कैलास कोते, राम कोते, शाम कोते, विजय कोते, बाळासाहेब कोते, बाबुराव कोते, सर्जेराव कोते, राजेंद्र कोते, निलेश कोते, सचिन शिंदे, राजेंद्र गोंदकर, तुषार गोंदकर, प्रमोद गोंदकर,रामराव शेळके, भाऊ भोसले, रवींद्र गोंदकर, सुजित गोंदकर व शिर्डीतील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कोते परिवारातील सर्व कुटुंबीयांनी हजेरी लावत या कार्यक्रमाची शोभा वाढवली.

