प्रतिनिधी : बाबासाहेब तिपुळे
उक्कडगाव : २६ / नगर तालुक्यातील उक्कडगाव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सरपंच श्री. नवनाथ म्हस्के यांच्या हस्ते झेंडावंदन करून ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला .
सरपंच श्री. नवनाथ म्हस्के यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले .नंतर राष्ट्रगीत घेण्यात आले राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.
उपस्थित मान्यवरांनी देशभक्तीपर भाषण करून प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन सामाजिक संदेश दिला . प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुलांना व परिसरातील नागरिकांना मिठाईचे वाटप करण्यात आले .
प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमाला सरपंच नवनाथ म्हस्के बाळासाहेब म्हस्के सावंत गुरूजी गणपत म्हस्के मेजर बाळासाहेब तिपुळे चंद्रकांत शिंदे सागर शिंदे सतिश साठे ग्रामसेवक फणसे भाऊसाहेब तसेच शिक्षक बोरूङे सर मुख्याध्यापिका सुचिता म्हस्के तसेच अंगणवाडी सेविका आशा सेविका ङाॅक्टर बिङवे सिस्टर व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते .

