shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंकज कुमावतांनी कत्तल खान्याकडे जाणारे कंटेनर पकडले : ६ आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल..!!



-------------------------------------------------

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि:-. 
 नेकनूर येथून तामिळनाडू राज्यात कत्तलीसाठी घेऊन जात असलेले ३५ बैल भरलेले कंटेनर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी ताब्यात घेत सहा जणांविरुद्ध कार्यवाही केली आहे.



या बाबतची माहिती दि. १४ जानेवारी शुक्रवार रोजी मा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना माहिती मिळाली की, कंटेनर क्र.(के ए ५१ /ए एफ ९००९) मध्ये नेकनूर येथील जनावरे भरून बेकायदेशीररित्या कत्तल करण्यासाठी तामिळनाडू राज्यात घेऊन जात आहेत. सदरचा कंटेनरने नेकनुर येथून निघाला असून तो केज मार्गे जात आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाल्याने पंकज कुमावत साहेब यांनी पोलीस अधीक्षक बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे केज येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष मिसळे व उपविभागीय कार्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक मनोज कुलकर्णी, सहाय्यक फौजदार शेषराव यादव, पोलिस हेड कॉन्स्टेबल बालाजी दराडे, सुहास जाधव, पोलीस नाईक राजू वंजारे, सचिन अहंकारे यांनी सदरचे कंटेनर मस्साजोग येथे  दि. १५ जानेवारी शनिवार रोजी मध्यरात्री १:०० अडवून कंटेनरची पाहणी केली असता कंटेनर मध्ये एकूण ३५ बैल मिळून आले. सदर कंटेनर चालक व मालक यांना सदर बैलाचे कागदपत्र बाबत विचारणा केली असता जवळ नसल्याचे सांगितल्याने बैल व कंटेनर ताब्यात घेऊन केज पोलीस ठाण्यात आणून ताब्यात घेतले. 

यातील ३५ बैलांची किंमत १४ लाख रु आणि कंटेनर २५ लाख असे एकूण ३९ लाख रु किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशावरून पोलीस हेड कॉन्स्टेबल बालाजी दराडे यांनी केज पोलीस ठाण्यात कंटेरचा चालक दिनेश अरवींद उत्तीरकुमार वय २९ वर्षे रा. मक्कीनंपत्ती ता. पोलाची जि. कोलींबतोर, तामिळनाडु, मुबदी चन्नअप्पा धर्मराज वय ४८ वर्षे रा. नरसिंगपुरम ता. पोलाची जि. कोलींबतोर, तामिळनाडु, सिलेमबरसन गणपती वय ३४ वर्षे रा. कंबमपुर जि. टेनी, तामिळनाडु , आर. जयकुमारा राजागम वय ४८ वर्षे रा. कबमपुर जि. टेनी, तामिळनाडू , सय्यद फेरोज सय्यद मोबिन वय ३६ वर्षे रा . दर्गा कॉलनी, नेकनूर ता. जि. बीड व अतीक रशीद कुरेशी रा. मोमीनपुरा बीड ता. जि. बीड या सहा जणांच्या विरुद्ध गु र नं ८/२०२२ कलम ११(१) (डी), ११(१) (ई) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनीयम २९६० कलम ५ (ए) (१), ५ (ए) (२), ५ (बी) १२ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधीनीयम कलम १९७६, ६६/१९२ मोटार वाहन कायदा १९८८ कलम ११९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदर प्रकरणातील सहा आरोपी ताब्यात घेतले असून पोलीस नाईक धनपाल लोखंडे हे पुढील तपास करीत आहेत.
close