पुनाळ । प्रतिनिधी (सुरेश वडर) :- पुनाळ(ता.पन्हाळा) येथील नाभिक समाजातील नव युवक तरुण आपला पारंपरिक व्यवसाय केशकर्तनालय सांभाळून समाज हिताचे विविध सामाजिक कामे करुन लोकांना चेतना युक्त केले आहे.
सामंजस्य , सहह्रुदयी, मनमिळाऊ व स्पष्टवक्तेपणाचं प्रामाणिक व्यक्तीमत्व याची दखल घेऊन पश्चिम पन्हाळा पत्रकार संघाच्या वतीने पोर्ले (ता.पन्हाळा) येथे त्यांना आदर्श सामाजिक पुरस्कारांने सन्मानीत,दत्त दालमियाचे हेड रंगाप्रसाद,सरपंच गीता चौगले,पत्रकार संघाचे अध्यक्ष अंगध चौगले,उपाअध्यक्ष सागर चौगले,सचीव धनाजी गुरव,गावठाणकार अप्पासाहेब खोत या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
समाजसेवक. समर्पकतेची जाणीव असली की,सामाजिकता आपोआप अंगी रुजते याप्रमाणे यांनी समाजसेवेचा वसा जपला आहे.गावातील ओबीसी संघटनेचा सचिव,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य ,नरवीर शिवा काशीद स्वच्छतः व संवर्धन समिती सदस्य ते कोल्हापूर जिल्हा नाभिक महामंडळाचे कार्यकारी चिटणीस हा प्रवास थक्क करणाराआहे

