shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापुर मध्ये ३१ डिसेंबर रोजी दारू नको दूध प्या हा अनोखा उपक्रम संपन्न.


इंदापुर मध्ये ३१ डिसेंबर रोजी दारू नको दूध प्या हा अनोखा उपक्रम संपन्न. 
इंदापूर प्रतिनिधी:व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य शाखा इंदापूर यांच्या वतीने युवक मित्र बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डिसेंबरच्या रात्री विधायक ३१ डिसेंबर दारू नको दूध प्या हा अनोखा उपक्रम इंदापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राबवण्यात आला.यामध्ये सहभागी युवक व नागरिकांना रचना देशी गोसंवर्धन यांच्या वतीने मोफत सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अंकिताताई शहा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप  गारटकर म्हणाले 'संपूर्ण महाराष्ट्रात जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त संस्कारक्षम युवा पिढी घडवण्याचं कार्य कौतुकास्पद आहे कोणत्याही राष्ट्राची युवा पिढी संस्कारक्षम असल्याशिवाय राष्ट्र उभारणी होऊ शकत नाही समाजामध्ये व्यसनमुक्तीची क्रांती घडवायची असेल तर व्यसनमुक्त युवक संघाचा आदर्श सर्वांनी घ्यावा.
     यावेळी प्रास्ताविकामध्ये प्रा. धनंजय देशमुख यांनी व्यसनमुक्त युवक संघाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती बरोबरच ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण,चला व्यसनांची होळी करूया,तंबाखू विरोधी दिन असे वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येतात त्याचाच एक भाग इंदापूर शहरामध्ये मागील १२ वर्षापासून  सुरु असलेला हा दारू नको दूध प्या हा विधायक कार्यक्रम मागील वर्षापर्यंत महाराष्ट्रातील जवळजवळ २४० ठिकाणी राबविण्यात आला.
    यावेळी शिवसेना नेते विशाल बोंद्रे,माजिदखान पठाण, नगरसेवक अमर गाडे,अतुल शेटे, जावेद शेख,मेजर मारुती मारकड,मेजर महादेव सोमवंशी,पतंजली योग समितीचे डॉ. संजय शिंदे,मल्हारी घाडगे ,सचिन पवार,रविंद्र परबत,शरद झोळ,युवा क्रांती प्रतिष्ठानचे धरमचंद लोढा,प्रशांत उंबरे,शुभम पवार आदी उपस्थित होते.
  यावेळी  प्रताप कदम,तानाजी पांडुळे, विकास खिलारे,सचिन परबते यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.धनंजय देशमुख यांनी तर विजय नवल व संतोष नरुटे यांनी सूत्रसंचालन केले आभार माजी नगरसेवक प्रशांत सिताप यांनी मानले 

     कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आस्लम शेख,विठ्ठल शिंगटे,अख्तर मोमीन ,गणेश कांबळे, इंद्रनील देशमुख प्रयत्न केले.
close