एरंडगाव । शेवगाव येथील सामाजिक कार्यकर्ते रोहित काथवटे यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देत त्यांनी पाथर्डी येथील मोहरी रोड वरील अनाथ मतिमंद मुलांचे बालग्रह येथे हिवाळ्यात वापरण्यासाठी ब्लॅंकेट व खाऊ करून अनाथ मुलाबरोबर आगळावेगळा वाढदिवस साजरा केला.
यावेळी शिवानी काथवटे, सुनिता काथवटे, मधुकर काथवटे, वर्षा काथवटे सुरेश काथवटे, संदीप काथवटे भारती काथवटे, पूजा काथवटे, शिशुभारत डहांके, शारदा डहांके, सपना काशीद, मालतीबाई डांगरे, सोनम काशीद, सानिका घटमाळ, शीला डहांके, शुभम डहाळे, रोहन शिंनगारे, बब्बूभाई तांबोळी, अनाथ मतिमंद मुलाचे बालग्रह शाळेचे मुख्याध्यापक -आदिनाथ शिरसाठ, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश मेघनर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक गौरव खताळ, यांनी केले तर आभार- प्रशांत लोखंडे यांनी मानले. संस्थेच्या अध्यक्षा श्रीम. अनिता अशोक निर-हाळी मॅडम, संस्थेचे विश्वस्त सचिन प्रकाश तरवडे सर राजनंदिनी रोहित काथवटे याचा वाढदिवस या अनाथ मतिमंद विद्यार्थ्यां सोबत साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांनी राजनंदिनीस वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

