प्रकाश मुंडे| बीड जिल्हा प्रतिनिधि :-
केज नगरपंचायत निवडणूकित तेरा जागेसाठी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असून राहिलेल्या चार जागेसाठी निवडणूक प्रक्रिया, निवडणुक आयोगाने सुरु केली आहे व प्रभाग आरक्षण जाहीर केले आहे ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर नगरपंचायत वार्ड आरक्षण जाहिर केले, त्यात प्रभाग क्रमांक, १, २, ८, १२ हे प्रभाग ओबीसी प्रवर्गासाठी पडले होते, ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे राहिलेल्या चार प्रभागाची निवडणूक खुल्या प्रवर्गा मधून घेण्याचे ठरले त्यानुसार निवडणूक
आयोगाने सोडत पद्धतीने वार्ड आरक्षण जाहिर केले. वार्ड क्रमांक २ व ८, हे सर्वसाधारण महिलासाठी तर वार्ड क्रमांक १२ व १, या दोन जागेसाठी ओपन पुरुष वर्गासाठी सोडण्यात आल्या झालेल्या १३ जागेसाठी शिवसेना नेत्यांनी पॅनलप्रमुख गिरिष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणूक प्रक्रियेत भाग घेतल्यामुळे नगरपंचायत निवडणूकिला चांगलाच रंग आला आहे, व विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे त्यामुळे राहिलेल्या चार जागेसाठी शिवसेना पूर्ण ताकतीने निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे माहिती शिवसेना नेते तथा पॅनल प्रमुख गिरिष देशपांडे यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रत्नाकर अप्पा शिंदे ,बालासाहेब पवार ,प्रभाकर शिंदे ,संदीप शिंदे व मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांची उपस्थिति होती.

