.व्याहाळी केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न.
शिक्षण परिषदेस मार्गदर्शन करताना सुलभक राजकुमार भोंग सर
इंदापूर प्रतिनिधी:आज दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी व्याहाळी केंद्राची शिक्षण परिषद जि प प्राथमिक केंद्रशाळा निमगाव या ठिकाणी पार पडली.शिक्षण परिषदेची सुरुवात राष्ट्रगीताने झाली नंतर केंद्रप्रमुख संभाजी आजबे साहेब यांनी प्रास्ताविक केले.सुलभक राजकुमार भोंग सरांनी प्रथम पूर्वचाचणी सोडवून घेतली नंतर निष्ठा एफ एल एन नोंदणी,दिक्षा अँप डाउनलोड करणे व रजिस्ट्रेशन करणे याबाबत सविस्तर माहिती दिली.त्या नंतर सुलभक नजीर शिकीलकर सरांनी अध्ययन स्तर निश्चिती व मूलनिहाय कृती आराखडा कसा बनवायचा याचे प्रात्यक्षिक घेतले.सर्व शंका कुशंकाचे निरसन करून उत्तरचाचणी सोडवून शिक्षण परिषदेची सांगता झाली.शिक्षण परिषदेस केंद्रातील १ ते ८ ला शिकवणारे सर्व शिक्षक उपस्थित होते.आभार उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक सतीश भोंग सरांनी मानले.सदर शिक्षण परिषद कोरोनाचे सर्व नियम पाळून पार पडली.

