वर्षाच्या शेवटच्या दिवशी महाराजा बिर्याणी हाऊसमध्ये खवय्यागिरी यांची रेलचेल.
इंदापूर प्रतिनिधी: बिर्याणी म्हटलं की गरम गरम मांसाहारी हलकं जेवण याबरोबर रस्सा काही ग्राहक हौसेने खातात तर काही ग्राहक बंद पॅक मध्ये घरी घेऊन जातात.
असंच इंदापूर लगत असणारे कृषी उत्पन्न बाजार समिती च्या बाजार गाळ्यांमध्ये नुकतेच काही महिन्यांपूर्वी आनंद रेडेकर, प्रवीण देवकर, धनाजी नन्नवरे यांनी महाराजा बिर्याणी हाऊस ची उभारणी केली असून त्यामध्ये आकर्षक पद्धतीने सजावट आणि स्वच्छ असे बिर्याणी हाऊस तयार केलेले आहे. या ठिकाणी २०२१ चा शेवटचा दिवस म्हणजेच ३१ डिसेंबर या दिवसी हौसेने खाणारे खवय्ये मोठ्या प्रमाणात कोरोना काळाचे निर्बंधाचे पालन करीत बिर्याणीचा आस्वाद घेत असताना दिसत होते. तसेच आपल्याबरोबर घरातील सदस्यांनाही बिर्याणीचा आस्वाद मिळावा म्हणून बिर्याणी पार्सल पद्धतीने घेऊन जात असताना दिसले. सदर खवय्यांची रेलचेल पाहून बिर्याणी हाऊसचे मालक आनंद रेडेकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, चाळीस किलो तांदूळ आणि चाळीस किलो चिकन दिवसभरामध्ये खवय्यांसाठी तयार केलेले संपले यामध्ये काही ग्राहकांनी या ठिकाणी आस्वाद घेतला तर काहींनी पार्सल पद्धतीने घेऊन गेले. एकंदरीत आम्ही तयार केलेली बिर्याणी आणि देण्याची पद्धत हे ग्राहकांना आवडत असल्यानेच या ठिकाणी ग्राहकांची रेलचेल आज मोठ्या प्रमाणात निदर्शनास आली. आम्ही उभारलेल्या बिर्याणी हाऊस च्या ग्राहकांच्या प्रतिसादाने आज मन भारावून गेले .ज्या ग्राहकांनी महाराजा बिर्याणी हाऊस मध्ये बिर्याणीचा आस्वाद घेतला त्या सर्व ग्राहकांना महाराजा बिर्याणी हाऊस च्या वतीने नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. लवकरच इंदापूर शहरातही दुसरी बिर्याणी हाऊस चालू करणार आहोत.

