वालचंदनगरातील रस्ते व बंदिस्त गटार योजनेसाठी अडीच कोटी रुपये पर्यंत निधी देणार - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे .
इंदापूर प्रतिनिधी:
वालचंदनगर च्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत वालचंदनगर मधील विविध प्रमाणात रस्ते व बंदिस्त गटार योजनेसाठी दोन ते अडीच कोटी रुपये देण्याची घोषणा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वालचंदनगर येथील श्री वर्धमान विद्यालय येथील रस्त्याचे भूमिपूजन कोनशिला अनावरण करताना ( दि.३१) व्यक्त केले.
पुणे जिल्हा रस्ते बांधकाम विभागाअंतर्गत येणाऱ्या वालचंदनगर मधील श्री.वर्धमान विद्यालय येथील रस्त्याचे भूमिपूजन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व चिरागशेठ दोशी यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करून पार पडले.
यावेळी बोलताना राज्यमंत्री भरणे यांनी दिलेला शब्द एक महिन्याच्या आत पाळत असल्याची आठवण करून देत. आपले बालपण, तरुणपण, वालचंदनगर मध्ये गेल्याचे सांगितले .वालचंदनगरास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत वालचंदनगर मधील विविध प्रमाणात रस्ते व बंदिस्त गटार योजनेसाठी दोन ते अडीच कोटी रुपये देण्याची घोषणा केली.
यावेळी बोलताना वालचंदनगर इंडस्ट्रीचे क्लस्टर हेड धीरज केसकर यांनी राज्यमंत्र्यांच्या कामाचा वचनपूर्तीच्या वेगाबद्दल कौतुक करून आभार मानले.
या कार्यक्रमासाठी वालचंदनगर इंडस्ट्रीचे एम.डी चिराग दोशी, शाळा समिती अध्यक्ष अमोल गेंगजे, प्रताप पाटील, शिवाजी खटकाळे सौ शैलाजाताई फडतरे, सचिन सपकळ, ज्येष्ठ पत्रकार अतुल तेरखेडकर, श्री वर्धमान विद्यालयाचे प्राचार्य हनुमंत कुंभार, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच कंपनीचे विविध पदाधिकारी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पंकज पाटील यांनी केले.

