नगर / प्रतिनिधी
नगर : २९ / दि.२६ जानेवारी च्या दिवशी ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना श्रीरामपूर पालिकेतील झेंडावंदनास तत्कालीन नगराध्यक्ष अनुराधा आदिक या पालिकेच्या झेंडावंदनास अनुपस्थित राहिल्याने तसेच कार्यकाळ संपताच पदाधिकाऱ्यांना आपल्या जबाबदारीचा विसर पडल्या संदर्भात इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रदेशाध्यक्ष दैनिक खबरदार पुढारी , चौफेर कानोसा स्थानिक न्युज मराठी वहिनीचे व्यवस्थापकीय संपादक जयेश सावंत यांनी विरोधात बातमी लावल्याचा राग मनात धरून श्रीरामपूर पालिकेच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एका कार्यक्रमात राजकीय पदाच्या गुमीॅत दमदाटी व अरेरावी केल्याचा प्रकार घडला होता.
यांच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीने संबंधित नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन आज जिल्हा पोलिस अधीक्षक यांना कारवाई करण्या संदर्भात आज ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय निवेदन दिले.
या वेळी ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र राशिनकर , गिरीश रासकर, जिल्हा उपाध्यक्ष शिवा म्हस्के, विनोद साळवे,सबिल सय्यद, बाबासाहेब तिपुळे, दादासाहेब आगळे, संजय वायकर, साहिल सय्यद, रफीक शेख, अमोल डोळस आदि उपस्थित होते .

