बावडा येथे कै. सीमाताई विजय जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरण स्मृतिप्रीत्यर्थ कै.शहाजीराव पाटील प्राथमिक आश्रम शाळेस सौर ऊर्जा वाटर हीटर संच दिले भेट.
सौर ऊर्जा वॉटर हिटर संचाचे हस्तांतर समारंभाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व उद्घाटक हृदयरोग तज्ञ एम. के. इनामदार होते.
इंदापूर प्रतिनिधी: बावडा येथील विजय राव नारायणराव जगताप व समस्त जगताप परिवार बावडा यांच्यावतीने कैलासवासी सीमाताई विजय जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरण स्मृतिप्रीत्यर्थ कै. शहाजीराव पाटील प्राथमिक आश्रम शाळेस सौर ऊर्जा वॉटर हीटर संच विद्यार्थ्यांच्या गरम पाण्याच्या आंघोळीची सेवा व्हावी या उद्देशाने सदर संचाचे हस्तांतरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर एम के इनामदार व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते या सौर ऊर्जा वॉटर हिटर संचाचे उद्घाटन (दि.२९) रोजी करण्यात आले.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील अध्यक्षीय भाषणातून आपले मत व्यक्त करताना म्हणाले की,आज कै. सीमाताई जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरण हा आपण वेगळा उपक्रम म्हणून आज गावांमध्ये साजरा करीत आहोत. माझे सहकारी विजय जगताप, प्रकाश जगताप, सुरज जगताप, राहुल जगताप, विक्रम जगताप, तेजस जगताप, जगताप परिवाराची सर्व सहकारी. आजपर्यंत खूप कार्यक्रम झाले परंतु आजचा कार्यक्रम हा रुदयाला स्पर्श करणारा कार्यक्रम आहे. कारण सीमाताई यांना आपण बहीण मानतो आणि विजय जगताप यांना पहिल्यापासून भाऊ मानतो. जगताप कुटुंबियांचे संबंध हे कै भाऊ कै. बापू यांच्या काळापासून ऋणानुबंध आहेत. सीमाताईंचा स्वभाव हा अतिशय प्रेमळ आणि कुटुंब सातत्याने आनंदित ठेवण्याचे काम, मुलींना मुलांना चांगले शिक्षण देण्याचे काम, आणि प्राप्त परिस्थितीत संसार समाधानाने कसा करायचा अशी शिकवण त्यांच्या कुटुंबात होती. आणि आजही आहे. आजची नवीन पिढी सुद्धा जर कुठल्या पदावर काम जरी करीत असेल तरी त्यांच्या मधील नम्रता आजही कायम आहे. मला वाटते ते संस्कारात्मक गुण सीमाताई च्या माध्यमातून या नव्या पिढीला निर्माण झालेल्या आहेत. म्हणून त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण आस विनम्र अभिवादन करतो. आश्रम शाळेतील मुलांना थंडीच्या काळात गरम पाण्याची आंघोळ मिळावी म्हणून त्या दृष्टीने वॉटर हिटर आपण जगताप परिवाराच्या वतीने आपण उपलब्ध करून दिली त्याबद्दल संस्थेच्यावतीने विजय जगताप आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करून धन्यवाद देतो.
प्रथम पुण्यस्मरणानिमित्त बावडा गावात समाज उपयोगी असा उपक्रम राबवून प्रथम नवा पायंडा पाडला असा आदर्श ठेवून अशा कार्यक्रमास सामाजिक उपक्रम राबवून जर आपण ते कार्य केले तर त्याच्या नावाला शोभेल असं भविष्य काळातलं कार्य आपल्या नव्या पिढीसमोर मांडता येईल असा प्रयत्न आपण कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो.
यावेळी डॉक्टर एम के इनामदार आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,सर्वप्रथम मला या कार्यक्रमास बोलवलं त्याबद्दल मी आभारी आहे. १९८० अकलूजला आलो. त्या सुरुवातीच्या एक-दोन महिन्यांमध्ये आदरणीय अशोक यादव यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते जडले. त्यांच्याबरोबर गप्पागोष्टी करायचो तसेच जेवणासाठी त्यांच्या घरी जायचो .त्यांची धाकटी बहीण म्हणजे कै. सीमाताई तसेच जगताप परिवार यांचेही संबंध चांगले होते आणि त्यांच्या कुटुंबात सीमाताई यांचे लग्न झाले. त्या १९८० नंतर जवळ जवळ पाच ते सात वर्षा ने मला सीमाताईंनी भाऊ मानले. आणि दर वर्षी अगदी न चुकता नारळीपौर्णिमेला व भाऊबीजेला नेहमी येत असायच्या. अतिशय मितभाषी, शांत, संयमी प्रेमळ स्वभावाच्या त्या होत्या. त्यांना मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला. तेव्हापासून त्यांना औषधे चालू होते. परंतु काही औषध उपचार चालू असताना त्यांना त्रास झाला आणि त्यांच्यासाठी मी काही करू शकलो नाही. याचे मला अतिशय दुःख झाले एवढ्या सालामध्ये बेचाळीस वर्षाच्या प्रॅक्टिस मध्ये दहा ते पंधरा पेशंट असे असतील की त्यांच्यासाठी मी काहीच करू शकलो नाही. जगताप कुटुंबीयांना खरंच धन्यवाद देईन सीमाताई च्या परोपकारी स्वभावाला अनुसरून हा कार्यक्रम केला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृती जपन अतिशय जिव्हाळ्याचा असतात. अतिशय चीरतन अशा गरीब मुलांना याचा फायदा व्हावा म्हणून सोलार हीटर संचाचे दान दिले आहे हे स्थिर आहे .सकाळी मुलांना गरम पाण्याची ऊब मिळेल आणि तीच सीमाताईंना खरी श्रद्धांजली ठरेल अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले.
ह.भ.प. डॉ.लक्ष्मणराव आसबे यांनीही पुण्यस्मरण याचा सविस्तर अर्थ स्पष्ट केला.
या कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य अशोक भाऊ घोगरे, नीरा-भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, समाज भूषण डॉक्टर असबे, सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे, महादेव घाडगे, पंडितराव पाटील, उमेश सूर्यवंशी, संतोष सूर्यवंशी, स्वप्नील घोगरे, डॉक्टर जय शंकर विभुते, अमोल घोगरे, माजी सैनिक लक्ष्मण घोगरे , अशोक मगर , नवनाथ पवार , विठ्ठल घोगरे , दत्तात्रय घोगरे , अजित जाधव, विकास शिंदे , अमोल बागल
कै. शहाजीराव पाटील प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक संतोष घोगरे व इतर मान्यवर आणि समस्त जगताप परिवार उपस्थित होते.
या कार्यक्रमास श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक अध्यापिका वर्ग, कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक, रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग ,आश्रम शाळेतील सर्व शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल जगताप यांनी केले. अध्यक्षीय सूचना प्राचार्य घोगरे. आर. सर यांनी मांडली त्यास अनुमोदन प्राचार्य वावरे सर यांनी दिले. सूत्रसंचालन मुलाने एसटी सर यांनी केले तर आभार सौ. आरती जगताप मॅडम यांनी मांडले
हा कार्यक्रम आश्रम शाळेच्या प्रांगणात आयोजित केलेला होता.

