पूर्णा । प्रतिनिधी,दि.२९:- पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या कातनेश्वर येथील मारुती रामराव पाथरकर हा गुटखा विक्री करतो.अशी माहिती मिळाल्यावरून त्याचे दुकानावर छापा टाकला असता 37,733 रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा मिळून आला असून त्याच्याविरुद्ध पूर्णा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणीचे जिल्हा पोलीस अधीक्षक जय मीना यांच्या पथकाने पूर्णा शहरात गुटखा घेऊन जात असताना त्याला पकडण्यात आले आहे. परभणी पोलीस अधीक्षक यांचे पथकातील एपीआय बोरकर यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीला अटक केली आहे. परभणी जिल्ह्यात एकही अवैध धंदा चालू देणार नसल्याचे एलसिबीचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी सांगितले.
पूर्णा तालुक्यात कातनेश्वर येथील गुटख्याच्या अड्ड्यावर धाड..! परभणी पोलीस अधीक्षक यांचे पथकाची कामगिरी..!!
पूर्णा शहरात झिरो फाटा कातनेश्वर येथे खुलेआम पान टपरीवर अवैद्य गुटका चालू आहे.. पूर्णा बीट जमादारच्या आशिर्वादाने येथील अवैद्य धंदे सुरु आहेत. याबद्दलची माहिती पूर्णा गोपणी पोलीस कर्मचारी पोलीस अधीक्षकांना अवैद्य धंदे चालू असल्याची माहिती का देत नाही..?अशी नागरिकांत उलटसुलट चर्चा सुरू सध्या सुरू आहे.

