shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागील दोन दिवसापूर्वी टिपू सुलतान यांच्या बद्दल अशोभनीय वक्तव्य केल्यामुळे निषेध..!


पूर्णा ।  प्रतिनिधी :-
राज्याच्या विधान सभेतील विरोधी पक्ष नेते तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मागील दोन दिवसापूर्वी टिपू सुलतान यांच्या बद्दल अशोभनीय वक्तव्ये केली असून या वक्तव्याचा दिनांक 28 जानेवारी रोजी पूर्ण शहरांमध्ये मुस्लिम समाज बांधवांकडून निषेध करण्यात आला.

मागील काही दिवसापासून राज्यामध्ये राजकीय वातावरण सुरु असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी टिपू सुलतान यांच्या बद्दल अशोभनीय वर्तन केले असून या वर्तनाचे राज्यभर तिव्र पडसाद उमटले असून मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे या वक्तव्याचा पूर्णा येथे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने वेगवेगळ्या समाज संघटनांच्या वतीने व निषेध करण्यात आला.
 
निषेधाचे निवेदन तहसीलदार पूर्णा यांना 28 जानेवारी देण्यात आले. त्यामध्ये देवेंद्र फडवणीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
close