शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक २८ डिसेंबर २०२२
रस्ता खुला करताना शेतजमिनीचे तुकडे होऊन अनेक शेतकरी राहणार वंचित..!!
राहुरी : राहुरी तालुक्यातील पानंद रस्ते, शिवरस्ते खुले करताना किती शेतकऱ्यांना या रस्त्यांचा फायदा होईल, हे न पाहता रस्ते खुले करण्यात येत आहे. तरी कोंढवड ते जुना पिंप्री रस्ता खुला करताना अल्पभूधारक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, यांची दक्षता घेत रस्त्याचा पर्याय निवडला जावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकर्यांचे नुकसान टाळुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना रस्त्याचा फायदा व्हावा, अशा पद्धतीने रस्ता खुला करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी छावा युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा व्यंकोजीराजे भोसले यांचे वंशज बाबासाहेब भोसले पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे सुरेशराव लांबे, क्रांतीसेनेचे मधुकर म्हसे, संदीप ओहोळ, श्री संत सावता माळी युवक संघाचे दिपक साखरे, जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराजे पालवे, छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष आशिष कानवडे आदींसह शेतकर्यांनी मागणी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, आज रोजी भुमि अभिलेख कडील नकाशा प्रमाणे राहुरीचे तहसीलदार यांनी जो निर्णय घेतला आहे, तरी त्या प्रमाणे रस्ता केल्यास शेतकऱ्यांची सोयीपेक्षा गैरसोय होण्याची शक्यता आहे. सदर कोंढवड ते जुना पिंप्री रस्ता खुला करताना अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनीचे लहान लहान तुकडे होऊन अनेकांचे घरे, शेड उद्धवस्त होणार आहे. गेली पन्नास वर्षांपासून या भागात शेतकरी वास्तव करत आहेत. त्यांनी आपल्या सोयीनुसार शेतात जाण्यासाठी रस्ते केले आहेत. नकाशा प्रमाणे रस्ता होण्यास अनेकांचा विरोध असुन त्याऐवजी तहसीलदार एफ आर शेख यांनी समक्षा पाहणी करून जास्त शेतकऱ्यांना फायदा होईल व मोठ्या प्रमाणात शेतकर्यांचे नुकसान होणार नाही, अशा योग्य मार्गाने नवीन रस्ता करावा, अशा मागणीचे निवेदन देण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन देताना विष्णू म्हसे, लक्ष्मण म्हसे, बाबासाहेब म्हसे, प्रवीण म्हसे, रंगनाथ म्हसे, संभाजी म्हसे, सुरेश म्हसे, अनिल पिसाळ, ऋषीकेश भोंगळ, विकास म्हसे, बाबासाहेब मकासरे, सनील पोटे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

