वडापुरी येथे प्रशांत गलांडे-पाटील यांची भाजप मोर्चा युवा वारियर्स उपक्रमाच्या पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक पदी निवडीबद्दल सत्कार संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील वडापुरी या गावाच्या ठिकाणी गंगावळण येथील प्रशांत गलांडे-पाटील यांची नुकतीच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी भाजप युवा मोर्चा युवा वारियर्स उपक्रमाच्या पश्चिम महाराष्ट्र संयोजक पदी निवड केली. त्याबद्दल गलांडे-पाटील यांचा सत्कार वडापुरी गावातील जेष्ठ नागरिक बाबुराव शिर्के व भारतीय जनता पार्टीचे इंदापूर तालुका संघटक सरचिटणीस महेश बोधले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी दत्तात्रेय देवकर, प्रवीण पवार अखिल भारतीय मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष, विठ्ठल कदम उपसरपंच, दत्तात्रय गायकवाड युवा नेते, नानासो पासगे मा.ग्रा. सदस्य, पोपट माने शिक्षण समिती अध्यक्ष श्रीनाथ विद्यालय, सामाजिक कार्यकर्ते सचिन काटकर, अनिल जाधव इत्यादी उपस्थित होते.
यावेळी प्रशांत गलांडे-पाटील यांनी उपस्थित यांना संबोधित करताना म्हटले की, युवा वॉरियर्स उपक्रमाचा संकल्प हा विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आलेला असून १८ ते २५ वयोगटातील मधील युवक विविध क्षेत्रात असणारे आरोग्य शैक्षणिक या विषयांमध्ये काम करण्यासाठी या युनिटची उभारणी करण्यात आली आहे. १८ ते २५ हा वयोगट देशाचे पुढील भविष्य आहे. हे भविष्य आपल्या परिवारात कसा जोडला जाईल आणि याच्यातून देशाची प्रगती कशी होईल याकडे लक्ष दिले जाणार असून यातून महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला याचा फायदा होणार आहे. ते पुढे म्हणाले की भाजपा युवा मोर्चा युवा वारियर्स उपक्रमाच्या पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक पदी भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी निवड झाली असून दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडेन असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी प्रवीण पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रशांत गलांडे-पाटील हे गंगावळण येथील रहिवासी असून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह तसेच जिल्हा कार्यकारणी मध्ये अनेक महत्त्वाच्या पदावरती काम केले असून तरुणांमध्ये त्यांच्याबाबतची वाढती लोकप्रियता लक्षात घेता भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी त्यांची निवड करून जबाबदारी सोपवली आहे.

