संघाच्या उपाध्यक्षपदी रमेश इथापे तर सहसचिव पदावर मनोरमा पवार यांची वर्णी .!!
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
केज येथे झुंजार पत्रकार संघाच्या वतीने संघाचे प्रथम यशस्वी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन वर्षाभरात संघाला नावारुपास आणणारे दैनिक हिंदजागृतीचे तालुका प्रतिनिधी श्री दशरथ चवरे यांच्या अध्यक्षतेखाली दि.31/12/2021रोजी शासकीय विश्रामगृह केज येथे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वर्षाभराच्या यशस्वी कार्याचा अवाहाल वाचन करून उपस्थित संघाच्या पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली पुढील वाटचालीसह नविन वर्षाच्या शुभदिनी 1जानेवारी 2022 पासुन संघाच्या नविन पदाधिकारी निवडीबाबत सांगोपांग चर्चा करून झुंजार पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक मराठवाडा साथीचे केज तालुका प्रतिनिधी तथा सामाजिक , शैक्षणिक , राजकीय चळवळीत सतत आग्रभागी असणारे तसेच केज तालुक्यातील सर्वांच्या मदतीला धावून येणारे श्री दत्तात्रय हांडीबाग यांची निवड करण्यात आली असून केज तालुक्यातील सर्वांना सुपरिचित आसणारे दैनिक अक्षराजचे बीड जिल्हा प्रतिनिधी व उद्योग , सामाजिक क्षेत्रात नावलौकिक असणारे मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तमत्व श्री रमेश गुळभिले यांची संघाच्या केज तालुका सचिवपदी निवडीसह मौजे पाथरा येथील भुमिपुत्र व पत्रकारिता क्षेत्रात ग्रामिण भागातील शेतकरी कष्टकरी , सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे व आधार फाऊंडेशनच्या माध्यमातून गोरगरीबांना सतत मदतीसाठी धावून जाणारे व दैनिक परळी प्रहाराचे केज तालुका प्रतिनिधी श्री मनोराम पवार यांची संघाच्या सहसचिवपदी निवड करुन , ग्रामिण भागात पत्रकारिता , सामाजिक उपक्रमात सदैव सहभागी असणारे दैनिक बीड प्रारंभचे केज तालुका प्रतिनिधी रमेश ईथापे यांची संघाच्या उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली असून यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष , सचिव , उपाध्यक्ष , सहसचिव यांना झुंजार पत्रकार संघाचे 2021 या वर्षात संघाला नावारुपास आणणारे प्रथम अध्यक्ष श्री दशरथ चवरे , उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी नवनिर्वाचित संघाच्या पदाधिकारी यांची निवड झाल्याबद्दल मनोगत व्यक्त करुन पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या निवडी पार पडल्यानंतर उपस्थित संघाचे पत्रकार सदस्य श्री महादेव दळवी ता.प्रतिनिधी दैनिक बाळकडू , श्री.श्रीराम तांदळे ता.प्रतिनिधी दैनिक पुण्यभूमी ,श्री दादासाहेब ढाकणे दैनिक महाराष्ट्र चौफेर , श्री .वाजेद शेख ता.दैनिक पार्श्वभुमी , श्री .दिनकर राऊत दैनिक महाराष्ट्र प्रतिमा , जेष्ठ पत्रकार श्री. सतिश केजकर सा. केज परिसर ,श्री . दादासाहेब आगे दैनिक कार्यारंभ ग्रामिण , श्री जावेद शेख दैनिक प्रतिवीर ,श्री. गोविंद शिनगारे वैभवशाली महाराष्ट्र न्युज , अशोक भोसले दैनिक लोकप्रभा , श्री.विनायक ठोंबरे दैनिक दिव्य अग्नी, श्री.सुमित मोरे दैनिक महाभारत , श्री.आप्पाराव सारुक दैनिक लोकमत ग्रामिण , श्री.शरद लोंढे दैनिक प्रतिवीर केज शहर प्रतिनिधी या सर्व संघातील सदस्यांनी निवड करण्यात आलेल्या पदाधिकारी यांचा पुष्पगुच्छ , पुष्पहार देऊन तसेच पेढे भरवुन पुढील संघाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या .
झुंजार पत्रकार संघाचे 2021 चे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा नविड झालेल्या नवनिर्वाचित पदाधिकार्यांनी केला ह्रद्य सत्कार
झुंजार पत्रकार संघाला एक वर्ष पूर्ण झाले असुन संघाची स्थापना करण्यात आली यावेळी संघाच्या अध्यक्षपदीची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे श्री. दशरथ चवरे व उपाध्यक्षपदावर यशस्वी कारकीर्द पार पाडणारे श्री. नंदकुमार मोरे यांचा संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष , सचिव , उपाध्यक्ष , सहसचिव व पदाधिकारी यांनी सत्कार करुन वर्षभर संघाला आल्पावधित नावारुपास आणल्याबद्दल अभिनंदन केले .
झुंजार पत्रकार संघाला यापुढेही उंचीवर नेण्यासाठी कायम कटीबद्ध राहु - अध्यक्ष दत्तात्रय हांडीबाग व सचिव रमेश गुळभिले.
नविन वर्षाच्या शुभदिनी निवड करण्यात आलेले पदाधिकारी यांनी पत्रकार संघाची वाटचाल यापुढेही कायम उंचीवर नेणारी आसेल तसेच संघाच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक , कृषी , राजकीय , तसेच विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघ तालुक्यातील शहरी भागातील तसेच ग्रामिण भागातील सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याच्या भुमिकेत आसेल आसे मनोगत प्रश्नावर कायम आवाज उठविण्यासाठी तत्पर आसेल आसे निवडीला उत्तर देताना संघाचे अध्यक्ष यांनी सांगितले.व सर्वांच्या सहकार्याने उत्साहात झुंजार पत्रकार संघाच्या निवडी एकमताने पार पडल्या.

