अकोले । प्रतिनिधी :-
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना तातडीने या पदावरून हटण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे नगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे पाटील यांनी मुख्यमंत्री यांना केली आहे.
मुख्यमंत्री यांना पाठवलेले निवेदनात म्हटले आहे की, मराठा निवेदन देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समनव्यक तथा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्यासह आप्पासाहेब कोडेकर, करण गायकर, धनंजय जाधव, किशोर मोरे, माधव देवसरकर, गंगाधर काळकोटे, रघुनाथ चित्र, नरेश मोरे यांच्यासह 25 समन्वयक चव्हाण यांच्या मेघदूत बंगल्यावर गेले होते. पण कोरोनाचे कारण सांगत चव्हाण यांनी निवेदन घेण्यास नकार दिला. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बंगल्याच्या दारातच घोषणाबाजी सुरू केली. म्हणून पोलिसांनी समन्वयकांना अटक करून पोलीस ठाण्यात नेले.
मराठा आरक्षणाचा विषय दीड वर्षात सर्वोच्च न्यायालयासमोर आलेला नाही. राज्य सरकारने दाखल केलेल्या पुर्नर्विचार याचिकेवर निर्णय झालेला नाही, भोसले समितीच्या शिफारशी राज्य मागास वर्ग आयोगाकडे पाठविण्यात आलेल्या नाही. राज्य मागास आगोयावर दोन मराठा सदस्य घेण्याची मागणीही पूर्ण केलेली नाही, कोपर्डीची केस उच्च न्यायालयात दाखल करतो असे चव्हाण म्हणाले होते. मात्र त्या प्रकरणात काहीही हालचाल नाही. त्यामुळे आम्ही आठ दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांना फोन करून मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्याबाबत माहिती दिली होती. तरीही चव्हाण यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आज आम्ही चव्हाण यांच्या शासकीय बंगल्यावर समनव्यक बंगल्यावर आले होते. मात्र हे मुजोर मंत्र्यांना मराठा आरक्षण साठी वेळ नाही.
घडलेली घटना अतिशय निंदनीय असून अशोक चव्हाण यांनचा निषेध नगर जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव डौले, उत्तर जिल्हा अध्यक्ष लालूशेठ दळवी, संयुक्त सरचिटणीस रमेश बोरुडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र काळे, युवक जिल्हाअध्यक्ष ओमप्रकाश काळे अकोले तालुकाध्यक्ष भानुदास गायकर, संगमनेर चे प्रकाश हासे, राहुरी तालुका अध्यक्ष अतुल तनपुरे शहर अध्यक्ष प्रदीप भुजाडी, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव डांगे, महीला जिल्हा अध्यक्ष सौ दुर्गाताई थोरात, अकोले सरचिटणीस अशोक आवारी, सुशांत वाकचौरे, अक्षय अभाळे, अमोल मोरे आदीनी केला आहे.

