shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नीरा भीमा कारखान्याचे ४ लाख मे. टन गाळप पूर्ण - हर्षवर्धन पाटील यांचेकडून अभिनंदन

नीरा भीमा कारखान्याचे ४ लाख मे. टन गाळप पूर्ण 
  - हर्षवर्धन पाटील यांचेकडून अभिनंदन
इंदापूर : प्रतिनिधी( दि.२० जानेवारी २०२२)
     शहाजीनगर (ता. इंदापूर ) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने चालु 21 व्या गळीत हंगामामध्ये 4 लाख मे. टन ऊस गाळपाचा महत्वाचा टप्पा आज गुरुवारी ( दि.20) पार केला आहे, अशी माहीती कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार व उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी दिली. 
      राज्याचे माजी सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली  कारखान्याचा चालू गळीत हंगाम उत्कृष्टपणे चालू आहे. कारखान्याने ऊस गाळपाचा 4 लाख मे. टनाचा पल्ला पार केलेबद्दल संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूक कंत्राटदार, मुकादम, तोडणी मजूर, अधिकारी, कर्मचारी व हितचिंतक यांचे अभिनंदन केले आहे, असे अध्यक्ष पवार व उपाध्यक्ष झगडे यांनी सांगितले.
       नीरा भीमा कारखान्याचे सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प आदी उपपदार्थ निर्मिती करणारे प्रकल्प पुर्ण क्षमतेने चालु आहेत. शेतकऱ्यांच्या सर्व उसाचे गाळप केले जाईल, त्यामुळे ऊस तोडी बाबत शेतकऱ्यांनी अकारण घाई करू नये. कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना चालू गळीत हंगामामध्ये 7 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्धिष्ट निश्चितपणे पुर्ण करेल, असे यावेळी अध्यक्ष लालासाहेब पवार व उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी नमूद केले.
     यावेळी संचालक विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, कमाल जमादार, प्र.कार्यकारी संचालक एस. जी. गेंगे-पाटील उपस्थित होते.
__________________________

close