shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इटगाव पुनर्वसन येथील नागरिकांना करावा लागतो अनेक समस्यांचा सामना..! प्रशासनाकडून होतेय दुर्लक्ष..!!

औरंगाबाद ।  प्रतिनिधी (सतीश लोखंडे):-
भंडारा जिल्ह्यातील भंडारा  तालुक्यातील पागोरा गिट्टीखदान या ठिकाणी इटगाव गावाचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे .याबाबत सविस्तर वृत्त असे की ,गोसेखुर्दच्या बॅकवॉटर मुळे आज येथील शेतकऱ्यांना ,नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून येथील मशानभुमी गोसेखुर्दच्या बॅकवॉटर मुळे पूर्णपणे बुडीत आहे. 

येथील शेतकऱ्यांचा जो मुख्य रस्ता आहे तो तीन वर्षापूर्वी ठेकेदाराने खडीकरण केले होते परंतु आज त्या रस्त्याची गिट्टी पूर्णपणे उखडली असून साधी सायकल सुद्धा त्या रस्त्याने चालवणे मुश्कील आहे .येथील शेतकऱ्यांना शेताकडे जाणारा जो रस्ता आहे तो गोसे बॅकवाटर मुळे पाण्यात आलेला आहे .त्यामुळे जवळपास दोनशे एकर जमीन जी बुडीत क्षेत्रात नाही त्या शेतीकडे जाण्याचा रस्त्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे .

याकडे शासनाने व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन प्रश्न त्वरित मार्गी लावावा अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते ललित मेश्राम ,संजय बांते ,प्रमानंद शहारे  जयपाल अतकरी ,भाग्यश्री सहारे ,हिरालाल कावळे शंकर अतकरी ,कुलदीप गंधे ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे व गावातील नागरिकांनी केलेली आहे.
close