shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

*'दादा' च्या भिम पराक्रमाने* डॉ. तनपुरे साखर कारखाना मोडीत, तर *सभासदांचे दिवाळे* निघणेची वेळ - आप्पासाहेब ढुस


देवळाली प्रवरा - दि.१२ जानेवारी:-

'दादा' च्या भिम पराक्रमाने सभासदांच्या मालकीचा असलेला देवळाली प्रवरा येथील डॉ. तनपुरे साखर कारखाना मोडीत तर सभासदांचे दिवाळे निघणेची वेळ आली असल्याचे कारखान्याचे सभासद आप्पासाहेब ढुस यांनी म्हंटले आहे. 

डॉ बा बा तनपुरे सहकारी साखर कारखाना मालकीच्या देवळाली प्रवरा हद्दीत असलेल्या  जमिनीतील ६७६७४ ब्रास मुरूम  उत्खनन झालेचे देवळाली प्रवरा येथील माजी कारभारी उर्फ 'दादा' ने दिलेल्या तक्रार अर्जावरून राहुरीचे तहशीलदार फसीयोद्दीन शेख यांनी डॉ तनपुरे कारखाना प्रशासनाला नोटीस बजावली आहे. 


      या नोटीसीमुळे कारखान्याला जवळपास ५४ कोटी रुपयांचा दंड होऊ शकतो असे बोलले जात असल्याने जर कारखान्याला हा दंड भरनेची वेळ आली तर कारखाना विकला तरी या दंड रकमेची भरपाई होणार नाही. आणि पर्यायाने सभासदांच्या मालकीचा असलेला हा कारखाना /  ही कामधेनू मोडीत निघायला वेळ लागणार नाही. आणि तसे झाल्यास या 'दादा' च्या भिम पराक्रमाने हा कारखाना मोडीत निघालेची इतिहासात नोंद होणार आहे.  असे आमचे प्रतिनिधींशी बोलताना या कारखान्याचे सभासद आप्पासाहेब ढुस म्हणाले.   
 पुढे बोलताना ढुस म्हणाले की, या दादांच्या पूर्वजांनीही यापूर्वी या कारखान्याचे लचके तोडून कारखाना आजारी पाडणेत सहभाग नोंदवला आहे, त्याबद्दल त्या पूर्वजांवर थकबाकी वसुलीसाठी रीतसर गुन्हेही दाखल झाले आहेत. परंतु कारखान्यात सत्तेत असताना त्या गुन्ह्यांवर आणि त्यांचेवर निघालेल्या ठाकबाकी वासुलीवर  पोचारा फिरविणेचे पापही यांच्या पूर्वजांनी केले आहे. 
      इतक्या मोठ्या प्रमाणात मुरूम वाहतूक होताना हे  तत्कालीन गाव कारभारी उर्फ 'दादा' झोपले होते का? यांनी ठरवले असते तर ते मुरूमाची वाहने अडवू शकले असते, मुरुमाची चोरी होत असताना त्यातील  मलिदा न मिळालेनेच या दादाने तक्रारीचे नाटक करून कारखान्याच्या हद्दीतील मुरूम चोरीची चौकशी लावली.., मात्र आता त्यात अगोदरच अडचणीत असलेला कारखाना कामगार आणि  सर्वसामान्य सभासद भरडला जाणार आहे.   
       एकंदरीत सभासदांच्या मालकीचा कारखाना मोडीत व सभासदांचे दिवाळे काढणाऱ्या  देवळालीच्या या 'दादा' ला सभासद कधीही माफ करणार नाही. 
        राहुरीचे तहसीलदार साहेब यांनी या मुरूम उत्खनन प्रकरणी फक्त कारखान्याला दोषी न धरता इतक्या मोठ्या प्रमाणात मुरूम कुठे गेला याचा तपास करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत असेही शेवटी ढुस म्हणाले.
close