"मा. रजिस्टार ऑफ कंपनीज
आकुर्डी, पुणे. यांच्याकडे खेड डेव्हलपर्स लिमिटेड(K.D.L.) कंपनीच्या१३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभे संदर्भात तक्रार दाखल(हरकत) करण्यात आली.
हरकतीचाविषय: खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीची(K.D.L.) कुठल्याही नियमांचे पालन न करता झालेली.१३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आपल्या अधिकारात रद्द करून (या सभेत झालेले ठरावांना मान्यता न देणे बाबत) नव्याने सभा घेणे संदर्भात आदेश होणेबाबत-
खेड सेझ प्रकल्प पुणे जिल्ह्यातील खेड शिरूर तालुक्यात २००८ मध्ये अस्तित्वात आला. या प्रकल्पाअंतर्गत पंधरा टक्के(१५%) परतावा विकसित प्लॉटच्या स्वरूपात देण्याचे ठरलेले असताना सोयीस्कररित्या बदल करून खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी स्थापन करून शेतकऱ्यांना तिचे जबरदस्तीने भागधारक बनविण्यात आले. खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचे कामकाज गेली तेरा वर्षे फक्त कागदोपत्री चालू असून वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे व खर्चाला मंजुरी घेणे एवढ्यापुरतेच मर्यादित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची विकसित प्लॉट साठी जमीन संपादनाचे वेळेस कपात करून घेतलेली २२% टक्के रक्कम(अंदाजे९५० भागधारकांचे मिळून ५७ कोटी रुपये)१३ वर्षे पेक्षा अधिक कालावधी होऊन अडकून पडली आहे. कंपनीचे कामकाजही नाही आणि मोबदलाही नाही/विकसित प्लॉट ही नाही, पैसे मात्र अडकून पडले. अशी अवस्था बाधित शेतकऱ्यांची झाली आहे.खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी ची १३वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 31 डिसेंबर २०२१ रोजी सकाळी११:००वाजता राजयोग हॉल शिवाजीनगर, पुणे. ४११००३ येथे घेण्यात आली.
सदर सभा ही अत्यंत चुकीच्या मार्गाने व बेकायदेशीर रित्या आणि कंपनी कायद्याला अनुसरून घेण्यात न आल्याने ती रद्द करावी. व या सभेमध्ये झालेले ठराव कुठल्याही प्रकारे मान्य करण्यात येऊ नये. आणि नव्याने ही सभा रीतसर कायदेशीरपणे/कंपनी कायद्यानुसार आपल्या(रजिस्टर ऑफ कंपनीज) प्रतिनिधींच्या अधिकारात घेण्यात यावी.
दिनांक ३१ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या सभेत खालील बेकायदेशीर गोष्टी झालेल्या आहेत. हे आपणास निदर्शनास आणून देत आहे. याबाबत आपण झालेल्या सभेचे इतिवृत्तात आणि सी.सी.टी.व्ही. फुटेज मागून तपासणी करावी. असे नमूद करण्यात आले आहे.
बेकायदेशीर गोष्टी खालील प्रमाणे.
१) सभेमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व शेअर्स धारकशेतकऱ्यांना सामावून घेण्यात आले नाही. अनेक शेतकऱ्यांना हॉलच्या बाहेर जाणीवपूर्वक ठेवण्यात आले.
२) कोरम साठी आवश्यक मर्जीतील लोकांनाफक्त घेण्यात आले. त्यामुळे अनेकांना सभे पासून परावृत्त व्हावे लागले.
३) सभेमध्ये कुणालाही मुक्तपणे मते मांडू दिली नाही. दबावतंत्राचा वापर करण्यात आला. कंपनीशी संबंधित लोकांनी आरडा-ओरडा करणे, कोणाला मुक्त मते मांडू न देणे, असे प्रकार मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले विचार मांडत आले नाही.
४) सभेत नॉमिनी प्रतिनिधीना स्टेजवर बसवणे हे नियमबाह्य आहे. याशिवाय नॉमिनला विचार मांडण्याचा अधिकार नसताना. त स्टेजवरून लोकांना मार्गदर्शन करणे मते मांडणे हे कंपनी कायद्याला धरून नाही.
५) करुणा च्या पार्श्वभूमीवर कोणत्याही नियमांचे पालन झाले नाही.
६) अनेक शेतकऱ्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेत विषयीची नोटिस मिळाली नाही. त्यामुळे त्यांना सभेस उपस्थित राहता आले नाही.
७) सभेमध्ये कोणतेही प्रोटोकॉल पाळण्यात आले नाही.
८) कंपनीवरील संचालक मंडळातील शेतकरी प्रतिनिधी व इतर प्रतिनिधींची नेमणूक प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवले जाते. शेतकऱ्यांमधून प्रतिनिधी लोकशाही पद्धतीने निवडले गेले नाहीत.
वरील सर्व गोष्टींचा विचार करून दिनांक 31 डिसेंबर २०२१ रोजी झालेली खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी ची सर्वसाधारण सभा आणि या सभेमध्ये झालेले ठराव रद्द करून नव्याने पुन्हा खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे. संदर्भात कंपनी ऑफ रजिस्टार कडूनआदेश व्हावेत. असे शेअर्स धारक कंपनीच्या शेतकरी सभासदांकडून नम्र विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी.
१) राष्ट्रपती, नवी दिल्ली.
२) पंतप्रधान, नवी दिल्ली.
३) मा राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
४) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई.
५) मा उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई
६) मा. गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
७) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, एम.आय.डी.सी. मुंबई.
८)मा. विभागीय आयुक्त, पुणे.
९) मा. जिल्हाधिकारी सो,पुणे.
९) मा.पोलीस उपनिरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन, पुणे
यांना पाठविण्यात आले आहेत.
निवेदना साठी खालील
शेतकरी प्रतिनिधीनी पुढाकार घेतला.
१) श्री काशिनाथ हजारे
२) श्री. सुदामराव तांबे
३) श्री. मारुतराव गोरडे
४) श्री. बाळासाहेब माशेरे
५) श्री. भानुदास नेटके
६) श्री. ऋषिकेश चव्हाण
७) श्री. विश्वास कदम
८) श्री. दादाभाऊ जैद
९) श्री. निलेश म्हसाडे

