पूर्णा । सय्यद कलीम :-
जिंतूर तालुक्यातील अकोली शिवारात रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात दुचाकी आणि ट्रकच्या भिषण अपघातात दोन सख्या व एका चुलत अशा तीघा भावांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी १० च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
जिंतूर तालुक्यातील मालेगाव येथील हे भावंड जिंतूरकडे निघाले होते. अकोली शिवारात पूलाजवळील एक खड्डा चुकविण्याच्या नादात भरधाव वेगाने जाणार्या एका ट्रकवर हे तीघे मोटारसायकलस्वार आदळले. त्यात तीघांचाही जागीच मृत्यू झाला.
अभिषेक काशिनाथ मेहेत्रे, योगेश काशिनाथ मेहेत्रे व रामप्रसाद विश्वनाथ मेहेत्रे असे या तीघा भावंडांची नावे आहेत. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी गोपने, पोलिस निरीक्षक दिपक शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड तसेच महामार्ग पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यांनी रुग्णवाहिका घेवून तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

