shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वालचंदनगर येथे भारत गॅस एजन्सी कार्यालयासमोरील महिलांचे उपोषण मागे

वालचंदनगर येथे भारत गॅस एजन्सी कार्यालयासमोरील महिलांचे उपोषण मागे

 

इंदापूर प्रतिनिधी :- इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर या गावी दिनांक २४ जानेवारी ते २८ जानेवारी पर्यंत चालू असलेले महिलांचे आमरण उपोषण आज मागे घेण्यात आले.उपोषणकर्त्या महिला नीता राजेश ठोंबरे , रिजवाना अमिन मनेरी , संगीता धनंजय खेडकर यांनी कै.राजेश ठोंबरे हे मागील तीन महिन्यापूर्वी कामावरती असताना मयत झाले होते व त्यांना मदत न केल्यामुळे तसेच धनंजय खेडकर व मनेरी यांना देखील पगार न मिळाल्याच्या कारणावरून त्यांचे उपोषण सुरू केले होते. सदरच्या उपोषणास सामाजिक कार्यकर्ते श्री अतुल ठोंबरे, श्री गोरख खंडागळे , श्री मधुकर कदम , श्री घनश्याम निंबाळकर.भीमशक्ती सामाजिक संघटनेचे विजय चितारे ,इंदापूर तालुका सोशल मीडिया चे उपाध्यक्ष विक्रमसिंह मोरे ,सरपंच कुमार गायकवाड व अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी पाठिंबा दिला होता .आज दिनांक २८ रोजी दोन्ही पक्षांकडून तडजोड होऊन पोलीस प्रशासना मार्फत श्री विनोद पवार साहेब , रतिलाल चौधर साहेब व भारत गॅस एजन्सीचे मालक चकोर शहा व सर्कल ऑफिस श्री ढवान साहेब व इतर सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सदर से उपोषण मागे घेण्यात आले सदरच्या उपोषणास श्री अतुल ठोंबरे यांनी महत्त्वाचा वाटा उचलला.
close