प्रतिनिधी : सुर्यकांत होनप
करमाळा : 29/ भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2022 बुधवार रोजी राष्ट्रीय समाज पक्ष करमाळा व बुधराणी हॉस्पीटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी नं.4 येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मोफत डोळे तपासणी कार्यक्रम राष्ट्रीय समाज पक्ष करमाळा तालुकाध्यक्ष मा. राज शेटे-देशमुख यांनी आयोजित केला होता.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी मी वेगवेगळ्या माध्यमातून पुढाकार घेणार आहे त्यासाठी सर्वसामान्य जनतेने लाभ घेण्यासाठी पुढे यावे. आज मोफत डोळे तपासणी शिबिर घेतले आहे हा त्याचाच एक भाग होता असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे नूतन तालुका अध्यक्ष राज शेटे देशमुख यांनी व्यक्त केले.
गावातील तरुण कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना समाजसेवेची संधी उपलब्ध करून देण्याचे काम मी या पुढे करेल असे मत शहाजी देशमुख यांनी व्यक्त केले.
समाजाच्या हितासाठी आणि समाज घडवण्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठे काम करण्याची संधी सर्व समाजाला आहे म्हणून शाळेमधील विद्यार्थ्यांकडे जात धर्म लिंग यांचा भेदभाव न करता खुल्या मनाने या देशाच्या नागरिकांचा विकास करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष यश कल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गणेश करे पाटील यांनी व्यक्त केले.
बहुजन समाजाच्या विकासासाठी मी कोणताही पक्ष पाहणार नाही आणि मनापासून सर्व समाजाला एकत्र आणण्याचे काम करण्यासाठी कटिबद्ध आहे असे मत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी बंडगर सर यांनी व्यक्त केले.
सरकारी दवाखान्यांमध्ये मिळणारे उपचार मोफत आहेत . परंतु त्याला साहाय्यक म्हणून
समाजातील सर्वसामान्य जनतेला आरोग्य विषयक सुविधा पुरवण्यासाठी पाहिजे ती मदत करण्यासाठी मी कधीही तयार आहे असे मत आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे सोलापूर सदस्य तथा मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष किसन कांबळे सर यांनी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित वांगी चे जेष्ठ नेते मा.शहाजी देशमुख सर , रासप जिल्हा प्रभारी मा. रणजित दादा सुळ , यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.गणेश करे-पाटील , कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा. शिवाजीराव बंडगर सर, बहुजन समाजाचे नेते प्रकाश कोळेकर मामा, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष मा.किसन कांबळे सर , भाजप नेते तथा शासकीय समितीचे सदस्य मा.नरेंद्रसिंह ठाकुर, वांगीचे सरपंच मा.शेळके साहेब, कार्यक्रमाचे मार्गदर्शक रासप जिल्हा सरचिटणीस मा.अंगद देवकाते , रासप नेते नितीन पारेकर-पाटिल बुधराणी हॉस्पीटल चे डॉक्टर मोहम्मद ठासरावाला व त्यांचे सहकारी दिनेश जैन , वांगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भारत भानवसे व सहशिक्षक राजाराम भिसे सर , युवा नेते शिवाजी खरात , रासप नेते राहुल गडदे , सरपंच किरण बोरकर उपसरपंच दत्ता खरात युवा नेते शुभम बंडगर , मा सरपंच तुकाराम खरात , साईनाथ बोरकर, आदित्य बंड़गर बाबासाहेब चौगुले , आशिष बंड़गर , प्रदिप वाघमोडे आदी उपस्थित होते.
नानासाहेब नलवडे, शशिकांत नलवडे, सातव अमृततुल्य चे मालक आतेश नानासाहेब सातव यांचे या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांनी केले तर आभार राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष राज शेटे देशमुख यांनी मानले.

