shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दहावे गुरुंच्या शहिद झालेल्या मुलांच्या स्मृती पित्यर्थ सीख समाजाने केले मोफत चहा नाष्टा वाटप ; दरवर्षी केले जातात विविध उपक्रम

प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगर : २ /  नगर येथील तारकपूर भागातील सीख व पंजाबी युवकां मार्फत त्यांचे दहावे गुरु यांनी त्यावेळी केलेल्या हिन्दु समाजाला वाचविण्यासाठी चे प्रयत्न आणि त्यांची जी मूले त्याकाळी शहीद झाली त्याच्या स्मृती पित्यर्थ सिव्हील हॉस्पिटल भागात दि . २८ ते दि .३१ डिसेंबर पर्यंत मोफत चहा वाटप करण्यात आले .

सिख समाजाचे जे दहावे गुरु आहेत त्यांचे चार मुले शहीद झाले होते त्यापैकी दोन मुलं  सात वर्ष आणि नऊ वर्षाची होती . त्यांना  पंजाब येथे भिंतीमध्ये गाडले गेले होते . त्यांच्या स्मृती पित्यर्थ दरवर्षी सीख आणि पंजाबी समाजा मार्फत मोफत चहा वाटप केला जातो.

सनी वधवा यांनी सांगितले की , दहावे गुरु असताना  त्यांनी हिंदु समाजाला वाचवायचे खुप प्रयत्न केले होते . त्यांच्या या आठवणी म्हणून  आपण ही सेवा दरवर्षी करतो तसेच दरवर्षी विविध कार्यक्रमही आयोजित केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

 यावेळी जिप्सी अरोरा ,करन धुप्पड,राजा नारंग ,
गुरुदीप सिंग धुप्पड , हरजितसिग वाधवा,
रामसिंग कतुरिया , राजेश कंतोड आदी युवक उपस्थित होते .

close