सोनई येथे साई आदर्श संस्थेच्या शाखेचे स्वमालकीच्या जागेमध्ये स्थलांतरण
सोनई । वार्ताहर :-
साई आदर्श संस्थेने विश्वासार्हता जिंकत आर्थिक क्षेत्रात उन्नती साधली आहे. संस्थेच्या हितासाठी अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांसह सर्व संचालक व कर्मचार्यांनी चिकाटी, मेहनत व पारदर्शकतेने ठेवीदार व कर्जदारांचा समन्वय साधल्याचे मत राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी व्यक्त केले.
सोनई येथे साई आदर्श संस्थेने स्वमालकीच्या जागेत भव्य इमारत उभारत शाखेचा स्थलांतरण सोहळा आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मा.आ.पांडूरंग अभंग हे होते. याप्रसंगी जिल्हापरिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन विभागाचे सभापती सुनिल गडाख, शनैश्वर देवस्थान संस्थेचे अध्यक्ष भागवत बानकर, नागेबाबा मल्टीस्टेटचे कडुभाऊ काळे,साई आदर्श संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे, सरपंच धनंजय वाघ, उपसरपंच प्रसाद हरकाळे, पोलिस पाटील सयाराम बानकर ,ब्रम्हकुमारी ऊषा दीदी ,पोपटराव कुर्हाट,वीकास बानकर,कारभारी डफाळ,ज्ञानेश्वर मल्टीस्टेटचे नाथाभाऊ पंडीत,राजेंद्र बीबवे,बाळासाहेब कुंभकर्ण, आदींची उपस्थिती होती.
पांडूरंग अभंग यांनी सांगितले की, कोणत्याही संस्थेच्या विकासासाठी संस्था प्रमुख हा महत्वाचा असतो. संस्थेच्या हितासाठी कटू निर्णयही घ्यावे लागतात. कर्ज वाटप व ठेवीदार यांचा योग्य समन्वय राखणे ही महत्वाची जबाबदारी असते. सहकार क्षेत्राच्या सर्व मुल्यांचे पालन करून साई आदर्श संस्थेच्या हितासाठी कपाळे यांनी मोलाचे योगदान दिले आहे. कपाळे हे सहकार क्षेत्रातील आयडॉल ठरले असून त्यांनी 18 शाखेंच्या माध्यमातून ठेवीदारांची मने जिंकली आहेत. साई आदर्श संस्था ही आगामी काळामध्ये अर्थ क्रांती करणारी संस्था ठरेल असे मत अभंग यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेचे अर्थ व पशू संवर्धनाचे सभापती सुनिल गडाख यांनी सांगितले की, मागिल काही काळामध्ये अनेक संस्था मोडकळीस आल्या. नोटबंदी, कोरोना संकट काळामध्ये काही संस्थांनी नावलौकिक कामगिरी करताना पत टिकवून ठेवली. त्यामध्ये साई आदर्श संस्था ही अग्रक्रमांकावर आहे. साई आदर्श संस्थेने सर्वांच्या विश्वास जिंकला आहे. कपाळे यांच्या मार्गदर्शनामुळे संस्थेचा विकासात्मक आलेख हा उंचावत असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक भाषणामध्ये संस्थेचे संस्थापक शिवाजीराव कपाळे यांनी संस्थेचा कामाचा लेखाजोखा मांडला. साई आदर्श मल्टिस्टेट संस्थेने 18 शाखांच्या माध्यमातून विकासात्मक घोडदौड राखली आहे. यासाठी संस्थेचे संचालक मंडळासह कर्मचार्यांची मेहनत महत्वाची आहे. तर संस्थेच्या कामकाजामध्ये ठेवीदारांसह लघु उद्योजक कर्जदारांनी नेहमीच पाठबळ दिले. त्यामुळे बहुतेक शाखा या स्वमालकीच्या जागेत कार्यरत होत असल्याचा आनंद लाभत असल्याचे सांगितले.
ईश्वरीय विद्यालयाच्या उषा दीदी यांनी संस्थेचा स्वमालकीच्या जागेत स्थलांतरण व सन 2022 नविन वर्ष हा दुग्धशर्करा योग आहे. धार्मिक क्षेत्रात दोनचा आकडा शुभ समजला जातो. दोन म्हणजे धार्मिक क्षेत्रात देणे असे होते. साई आदर्श संस्थेच्या माध्यमातून अनेकांना लाभ होणार असल्याचे सांगितले.
डॉ. विलास पाटील यांनी आभार तर सुत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी केले. संचालक विष्णू गिते, बाळासाहेब तांबे, अविनाश साबरे, किशोर थोरात, शफी शेख, चांगदेव साळवे, संगिताताई कपाळे, वेदांत कपाळे, धीरज कपाळे, अक्षय कपाळे, संस्थेचे मॅनेजर सचिन खडके यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
कार्यक्रमासाठी आघाव गुरूजी, राजेंद्र दिघे, राजेंद्र बोरूडे, संदिप कुसळकर, अॅड. सुनिल गडाख,संतोष क्षीरसागर,अंबादास राऊत,सचीन पवार,,सुनील तागड,संतोष दरंदले,सखाराम राशीनकर,प्रभाकर गडाख ,दादा वैरागर,स्टेट बँकेचे साटम साहेब, गाडेकर साहेब,महाराष्ट्र बँकेचे बोरुडे साहेब ,जिल्हा बँकेचे पोपराव शेटे साहेब आदींची उपस्थिती होती.

