पूर्णा- दि २६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी नगरपरिषद, तहसील, ग्रामीण रुग्णालय, न्यायालय, पंचायत समिती, अभिनव शाळा, आदी सर्व शासकीय निमशासकीय ठिकाणी खातेप्रमुख यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. पूर्णेतील नगरपरिषद येथे मुख्याधिकारी नितीशकुमार बोलोलू यांच्या हस्ते ध्वजवंदन साजरा करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते तर न्यायालयात न्यायाधीश यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.
यावेळी सर्व वकील संघ व कर्मचारी उपस्थित होते, तसेच ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधिक्षक गाडेकर यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात येवून येथे सर्व डाॅक्टर आणि कर्मचारी हजर होते तर पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी श्रीमती वानखेडे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. या वेळी सभापती अशोक बोकारे व पंचायत समिती सदस्य व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
तर तहसील कार्यालय येथे तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले येथेही सर्व कर्मचारी हजर होते. अभिनव शाळा येथे अध्यक्ष आनंद अजमेरा यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. या प्रसंगी सर्व शिक्षक उपस्थित होते. त्याच बरोबर तालूक्यातील सर्व ग्रामपंचायत, शाळा, आरोग्य उपकेंद्र, पोलीस ठाणे येथे देखील नियमाप्रमाणे सकाळी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

