सभासद शेतकऱ्यांना कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्या मार्फत पडस्थळ
येथे साखर कार्डचे वाटप.
इंदापूर प्रतिनिधी:आज दिनांक ३० जानेवारी रोजी येथे ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्या मार्फत साखर कार्डचे वाटप करण्यात आले.या साखर कार्डमुळे ऊस उत्पादक सभासदांना सवलतीच्या दरात साखर मिळते. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन दर महिन्याला 5 किलो याप्रमाणे सवलतीच्या दरात साखर दिली जाते. पडस्थळ येथील 380 सभासदांना साखर कार्डचे वाटप करण्यात आले.
कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धनजी पाटील,पद्माताई भोसले,व्हा.चेअरमन भरतशेठ शहा यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची वाटचाल सुरळीत सुरू आहे. गळीतास येणारा सर्व ऊस कर्मयोगी कारखान्याला देऊन शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी कुबेर पवार,सुभाष बोंगाणे, भारत बोंगाणे, महेंद्र रेडके, हरिभाऊ बोंगाणे, हरिदास मारकड,परमेश्वर कोळेकर,अशोक कोळेकर, साहेबराव राऊत, रामचंद्र कोळेकर व ऊस उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारखान्याचे कर्मचारी भारत गडदे व राजेंद्र बोंगाणे यांनी या कामी मोलाची कामगिरी बजावली.

