shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमण हटवण्याचा न्यायालयाचा आदेश‌..!

लवकरच रेल्वे प्रशासन अतिक्रमण हटवणार..!

 मागील तीस वर्षांपासून सुरू असलेला रेल्वे स्थानकासमोरील अतिक्रमण प्रश्न अखेर 
न्यायालयाकडून निकाली...!

पूर्णा ।  प्रतिनिधी (कलीम सय्यद):-
पूर्णा शहरातील संजय गांधी नगर यां भागात अनेक दिवसापासून नागरिकांनी रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केले होते. 

रेल्वे याबाबत औरंगाबाद येथील न्यायालयात धाव घेऊन अतिक्रमण काढण्याबाबत पाठपुरावा सुरु होता. 
अखेर दोन दिवसापूर्वी रेल्वेने मागील तीस वर्षापासून सुरु असलेली न्यायालयीन लढाई जिंकली असून न्यायाधीशांनी सदरील निकाल हा रेल्वेच्या बाजुने दिला आहे.

त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरातील संजय गांधी नगर अतिक्रमण लवकरच  हटवण्यात येणार असल्याची माहिती  रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.
 त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या त्या कारवाईकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
close