shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुंडेगावात विविध विकास कामांचा शुभारंभ ; पंचायत समिती स्थानिक विकास निधीतून १५ लक्ष निधी मंजूर


 प्रतिनिधी : निरज चांगटे

गुंडेगाव : ३१ /  नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे पंचायत समिती स्थानिक निधीतून  १५ लक्ष रुपयांच्या  विविध विकासकामांचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ ‌यांच्या अध्यक्षतेखाली व माजी पंचायत समिती सभापती रविंद्र भापकर यांच्या निधीतुन  गावातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवले.

पंचायत समितीच्या स्थानिक विकास निधीतून  गुंडेगाव येथे बंदिस्त सांडपाणी योजना,व सुसज्ज  स्वच्छता गृह बांधणे, पिण्याचे पाणी शुध्दीकरण यंत्रणा बसविणे व पिण्याचे पाणी ८०% मोफत असेल हे आवर्जुन सांगितले.या पंचायत समितीच्या स्थानिक विकास निधीचा वापर  करण्यात येणार आहे. गुंडेगाव गणातील पंचायत समिती सदस्य रविंद्र भापकर यांच्या माध्यमातून गुंडेगाव येथे  सर्वात जास्त निधी मंजूर करण्यात आले आहे असे मा.जिल्हा परिषद बाळासाहेब हराळ यांनी यावेळी सांगितले. 

तसेच राजकारणाचा विषय राजकारणात पुरता मर्यादित ठेवला पाहिजे तो विकास कामात न आणता प्रत्यक्षात काम केले पाहिजे.लवकरच गुंडेगाव येथे  सौरऊर्जा प्रकल्प सुरू होणार आहे.या प्रकल्पामुळे  शेतकरयांना दिवसा विज तीही मोफत उपलब्ध होणार आहे गु़डेगाव येथे नेहमीच बिबट्या दहशत असते ती या प्रकल्पात मुळे कायमची मार्गी लागणार आहे. हा प्रकल्प राज्यसरकार व केंद्र सरकार अंतर्गत आहे. लवकरच पाण्याच्या पाण्याची पाइपलाइन काम सुरू होणार आहे.

पण या विविध विकास कामाच्या उद्घाटनाला गुंडेगाव ग्रामपंचायतीचे संरपच, उपसंरपच सह काही ग्रामपंचायत  सदस्य यांनी पाठ फिरवली आसून पुन्हा जिल्हा परिषद, पंचायत समिती व विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणूकीच्या तोंडावर माजी  आमदार शिवाजी कर्डिले गट विरुद्ध बाळासाहेब हराळ  गटाचे राजकारण यावेळी पाहण्यासाठी मिळाले आहे. 

         यावेळी माजी  जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ ,पंचायत समिती विद्यमान सदस्य रविंद्र भापकर, माजी संरपच संजय कोतकर, माजी उपसंरपच सुनील भापकर,  वामनराव जाधव, महादेव चौधरी, रमेश चौधरी, शिवनाथ कोतकर, चंद्रकांत निकम,पोपट हराळ, पोपट तांबे, कारभारी आगळे, शिवाजी हराळ, संतोष हराळ,सर्जेराव माने,भिवसेन हराळ, मोहन कुताळ,नानासाहेब हराळ, आदिनाथ कासार,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

  " गुंडेगावसाठी मोठ्या प्रमाणात पंचायत समिती स्थानिक विकास निधी उपलब्ध करण्यात आला आसून, यामध्ये कोणतेही राजकारण नाही, ग्रामस्थांच्या मुलभुत सोईसाठी हा निधी दिला आहे, या भूमिपूजनासाठी गुंडेगाव ग्रामपंचायत संरपचाना कल्पना दिली होती, विकास कामांना गट तट विसरुन एकत्र आले पाहिजे "

रविंद्र भापकर, माजी उपसभापती पंचायत समिती.
close